भारतीय क्रिकेट विश्वातून एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. भारताचे माजी सलामीवीर आणि मुंबई संघाचे माजी कर्णधार सुधीर नाईक यांचे बुधवारी (5 एप्रिल) दुःखद निधन झाले. मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात त्यांनी वयाच्या 78 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे.
सुधीर नाईक यांनी भारताकडून 1974 साली कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यांनी 3 कसोटी आणि 2 वनडे सामन्यांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. महत्वाचे म्हणजे भारतीय क्रिकेटच्या इतिहासात वनडे क्रिकेट सामन्यात पहिला चौकार मारणारे खेळाडू हा विक्रम सुधीर नाईक यांच्या नावावर आहे. ( Former India Opener And Mumbai Great Cricketer Sudhir Naik Dies Aged 78 Hinduja Hospital )
माजी कसोटीपटू, मुंबई रणजी करंडक संघाचे माजी कर्णधार व वानखेडे स्टेडियमचे क्युरेटर सुधीर नाईक यांचे निधन झाले. त्यांनी सत्तरच्या दशकात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यांच्या निधनामुळे क्रिकेटच्या क्षेत्रातील एक जुनेजाणते व्यक्तीमत्व काळाच्या पडद्याआड गेले. भावपूर्ण… pic.twitter.com/sSZrz7FqHs
— Supriya Sule (@supriya_sule) April 5, 2023
2011 च्या विश्वचषकासोबत खास नाते…
भारताने 28 वर्षांनंतर 2011 साली वनडे विश्वचषक जिंकला. परंतू हे खुप कमी जणांना माहिती असेल की 2011 च्या विश्वचषकात सुधीर नाईक यांनीच वानखेडेची खेळपट्टी तयार केली होती. सुधीर नाईक यांनी बराच काळ मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर क्युरेटर म्हणून काम पहिले आहे.
अधिक वाचा –
– धवनचे विक्रमांचे आणखी एक ‘शिखर’! यापूर्वी केवळ दोन दिग्गजांना जमलाय ‘तो’ कारनामा
– गुवाहाटीत पंजाब किंग्स ‘एकदम ओके’! मजबूत राजस्थान रॉयल्सला पराभवाचा धक्का






