या वर्षाच्या अखेरीस बॉर्डर-गावसकर ट्राॅफीसाठी (Border Gavaskar Trophy) भारत आणि ऑस्ट्रेलिया (India Vs Australia) आमने-सामने असणार आहेत. दोन्ही संघांमध्ये 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीवर माजी क्रिकेटपटू सातत्याने आपले अंदाज व्यक्त करत आहेत. आता भारताचे माजी दिग्गज सुनील गावसकर (Sumil Gavaskar) यांनी बॉर्डर-गावसकर ट्रॉफीबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे.
गावसकर म्हणाले की, “भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियन भूमीवर बॉर्डर-गावसकर ट्राॅफी 3-1 अशा फरकाने जिंकण्यात यशस्वी होईल. डेव्हिड वॉर्नरच्या निवृत्तीनंतर ऑस्ट्रेलियन संघासाठी ओपनिंग ही समस्या बनली आहे. याशिवाय त्यांची मधली फळीही थोडी कमकुवत दिसते.”
सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी भारतीय संघाचे देशांमध्ये स्लोस्टार्टर म्हणून वर्णन केले आणि सांगितले की, “बॉर्डर-गावसकर मालिकेतील पहिली कसोटी महत्त्वाची असेल कारण भारतीय संघ मालिकेपूर्वी सराव सामने खेळणार नाही. काही कसोटी सामन्यांमध्ये एका आठवड्यापेक्षा जास्त अंतर आहे जे भारतीय संघासाठी घातक ठरू शकते.”
महत्त्वाच्या बातम्या-
एक तीर से दो निशाने! दुलीप ट्रॉफीसह बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठीही शुभमन सज्ज
हार्दिकसाठी आनंदाची बातमी! नताशा मुंबईत परतली, महिनाभरानंतर मुलाशी होणार भेट?
बांगलादेशच्या यष्टीरक्षकाचा पाकिस्तानात धोनीसारखा पराक्रम, ‘या’ खास यादीत मिळवले स्थान