भारत विरूद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघातील 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा कसोटी सामना पुणे येथे खेळला जात आहे. पुणे कसोटीत भारतीय संघात नवे बदल झालेले पाहायला मिळाले. ज्यामध्ये कुलदीप यादवला (Kuldeep Yadav) वगळून प्लेइंग इलेव्हनमध्ये वॉशिंग्टन सुंदरचा (Washington Sundar) समावेश करण्यात आला होता. याबाबत सुनील गावसकरांनी (Sunil Gavaskar) प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मात्र, त्यांनी या प्रकरणी आपले वक्तव्य मागे घेतले आहे.
भारताचा युवा स्टार अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदरने (WASHINGTON SUNDAR) आपल्या कामगिरीने सर्वांना हैरान केले. 17 वर्षांनंतर कसोटीत पुनरागमन करणाऱ्या सुंदरने न्यूझीलंडच्या फलंदाजांना चितपट केले. रचिन रवींद्र (Rachin Ravindra) आणि डॅरिल मिचेल (Daryl Mitchell) सारख्या घातक फलंदाजांसह त्याने एकूण 7 विकेट्स घेतल्या.
वॉशिंग्टन सुंदरच्या (Washington Sundar) निवडीवर सुनील गावसकर (Sunil Gavaskar) म्हणाले होते की, “वॉशिंग्टन सुंदरची निवड मला सांगते की भारतीय संघ त्याच्या फलंदाजीबद्दल चिंतेत होता. तो केवळ त्याच्या ऑफ स्पिनमुळेच नाही तर खालच्या क्रमाने अधिक धावा करू शकतो म्हणूनही संघात आहे. तरीही, मी कुलदीप यादवची निवड करेन जो चेंडू दोन्ही बाजूंनी वळवून फलंदाजांना फसवू शकेल.”
परंतु, सुंदरची कामगिरी पाहून सुनील गावसकरांनी (Sunil Gavaskar) त्याचे कौतुक केले. ते म्हणाले “किती प्रेरणादायी निवड. त्याला फलंदाजी आणि गोलंदाजी करता आली म्हणून त्याची निवड करण्यात आली. पुणे कसोटीत पहिल्या दिवशी भारतीय संघाचा दबदबा पाहायला मिळाला.”
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs NZ; “मला काय माहिती, त्याला हिंदी येते” भारतीय खेळाडूचा मजेशीर व्हिडिओ व्हायरल
भारताच्या माजी कर्णधारानं अचानक निवृत्ती जाहीर केली, 16 वर्षांच्या ऐतिहासिक कारकिर्दीला पूर्णविराम
वॉशिंग्टन सुंदरनं सात विकेट घेत मिळवलं दिग्गजांच्या क्लबमध्ये स्थान, 7 वर्षांनंतर असं प्रथमच घडलं!