---Advertisement---

‘त्याला’ श्रीलंकाविरुद्ध ६ पैकी ६ सामन्यात खेळताना पाहायचंय; बड्या भारतीय क्रिकेटपटूची इच्छा

On: रविवार, जुलै 4, 2021 10:25 PM
---Advertisement---

भारतीय संघाचे माजी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण यांना असे वाटत आहे की, श्रीलंका दौरा सूर्यकुमार यादवसाठी मर्यादित षटकांच्या स्वरूपात आपली योग्यता सिद्ध करण्यासाठी सुवर्णसंधी आहे. सूर्यकुमार यादवने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत भारतासाठी टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, ज्यात त्याची सरासरी 44 पेक्षा जास्त राहिली आहे. श्रीलंकेतील एकदिवसीय आणि टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात मधल्या फळीत तो फायदेशीर ठरेल, असा विश्वास लक्ष्मण यांना आहे.

भारतीय संघ 13 जुलैपासून श्रीलंकेत तीन एकदिवसीय सामने आणि 3 टी20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. तत्पुर्वी सूर्यकुमारबद्दल बोलताना लक्ष्मण म्हणाले की, “सूर्यकुमारसाठी ही एक उत्तम संधी आहे. मला असे वाटते की, त्याने श्रीलेकेविरुद्ध 6 पैकी 6 सामने खेळायला हवेत. त्याला एकदिवसीय आणि टी20 मालिकेतील प्रत्येक सामना खेळायला मिळाला पाहिजे. कारण टी 20 विश्वचषक संघात निश्चितपणे स्थान मिळवणारा तो उत्कृष्ट खेळाडू आहे. म्हणूनच त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावरही धावा करण्याचा आत्मविश्वास मिळावा अशी माझी इच्छा आहे.”

व्हीव्हीएस लक्ष्मण पुढे म्हणाले, “सूर्यकुमार आणि ईशान किशन या दोघांनीही त्या संधीचा फायदा घेतला पाहिजे. सूर्यकुमार यादवने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करावी. मला त्याला फलंदाजी करताना पाहण्याची खूप उत्सुकता आहे. तो अगदी मनमोकळे फटके मारतो. पदापर्णाच्या आंतरराष्ट्रीय सामन्यातील पहिलाच फटका सीमारेषेपार मारणे आणि तोही जोफ्रा आर्चरसारख्या दर्जेदार वेगवान गोलंदाजाविरूद्ध. यावरुन त्याच्यातील आत्मविश्वास, कौशल्य आणि प्रतिभा दिसून येते.”

टी20 विश्वचषक 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर या कालावधीत संयुक्त अरब अमिराती व ओमान येथे खेळवली जाणार आहे. परंतु त्या अगोदर भारतीय संघ श्रीलंका विरुद्ध 13 जुलैपासून एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

जेव्हा जडेजा अन् रैनामध्ये झाले होते कडाक्याचे भांडण, ‘असा’ मिटला होता वाद

ग्रेट भेट! लग्नाच्या वाढदिवशी धोनी फॅमिलीच्या घरी ‘नव्या पाहुणी’चे आगमन, तुम्हीही घ्या पाहून

‘आमच्या अनुभवापुढे तुमचा टिकाव तरी लागेल?’; धवनसेनेला कमी लेखणाऱ्या रणतुंगाला चोप्राचे खडेबोल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---