fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

धोनी स्वभावाने खूप चांगला, जगात असा उदार मनाचा खेळाडू नाही पाहिला

Former Indian Captain MS Dhoni Linked to the Ground Thapa

भारतीय फुटबॉल संघाचा मिडफिल्डर अनिरुद्ध थापाने भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. तो म्हणाला की, धोनी फार उदार मनाचा व्यक्ती आहे. जो खेळाडूंच्या मदतीसाठी नेहमी तयार असतो.

थापाने इंडियन सुपर लीगमध्ये (Indian Super League) चेन्नई एफसीकडून खेळतो. तसेच धोनी या संघाचा सहसंघमालक आहे. थापा पुढे म्हणाला की, धोनी त्याचा आवडता क्रिकेटपटू आहे.

अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून शनिवारी (९मे) थापाचा एक व्हिडिओ शेअर केला होता. यामध्ये तो म्हणाला की, “थाला (धोनी) माझा आवडता क्रिकेटपटू आहे. त्याने २८ वर्षांनंतर भारतीय संघाला विश्वचषक मिळवून दिला. तो आतापर्यंतचा सर्वात यशस्वी यष्टीरक्षक फलंदाज आहे.”

उत्तराखंडचा २२ वर्षीय थापावर धोनीच्या नेतृत्वाचा खूप मोठा प्रभाव पडला आहे. तो म्हणाला की, “धोनी कॅप्टन कूल आहे. मी त्याच्याशी चर्चा केली आहे. तो सामन्यादरम्यान जेव्हाही चेन्नईमध्ये असतो, तेव्हा संघाच्या जेवणामध्येही (लंच) तो सामील होतो. त्याची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे, तो सर्व खेळाडूंशी चर्चा करतो आणि आपला अनुभवही शेअर करतो.”

कमी वयात आयएसएलमध्ये सर्वोत्तम मिडफिल्डरांच्या यादीत आपल्या नावाचा समावेश करणारा थापा पुढे म्हणाला की, “धोनी आपल्या कठीण परिस्थितीतील गोष्टीही सांगतो. खेळाडूंबरोबर लंच दरम्यान जर त्याला कोणी बोलावले तरी तो आमच्याबरोबर बसून चर्चा सुरु ठेवतो.”

ट्रेंडिंग घडामोडी-

-काहीही न सांगता मला टीममधून बाहेर केलं, मित्र कोहलीनेही केली नाही मदत

-ड्रेसिंग रुममध्ये मला मारणार होते रिचर्ड्स, पाय पकडून मागितली माफी

-कोहलीला सतत तंबूचा रस्ता दाखवणारे जगातील ५ गोलंदाज

You might also like