भारत आणि श्रीलंका (IND vs SL t20 series) यांच्यातील टी-२० मालिका गुरुवारी (२४ फेब्रुवारी) सुरू होणार आहे. त्यापूर्वी भारताचे माजी प्रशिक्षक सुनील गावसकर (sunil gavaskar) यांनी भारतीय संघाच्या गोलंदाजी आक्रमणाचे कौतुक केले आहे. वेस्ट इंडीजविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी-२० मालिकेत भारतीय वेगवान गोलंदाजांनी अप्रतिम प्रदर्शन केले होते आणि दोन्ही मालिका ३-० अशा फरकाने जिंकल्या होत्या. गावसकर या गोलंदाजांचे प्रदर्शन पाहून खूप आनंदी आहेत.
वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेत संघाचे वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar), हर्षल पटेल (Harshal Patel) आणि दीपक चाहर (Deepak Chahar) यांनी अप्रतिम प्रदर्शन केले होते. अनुभवी जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि मोहम्मद शमी वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेत विश्रांतीवर होते, पण इतर गोलंदाजांमुळे त्यांची कमतरता जाणवली नाही. याच पार्श्वभूमीव सुनील गावसकरांनी या वेगवान गोलंदाजांचे कौतुक केले आहे.
स्टार स्पोर्ट्सवर बोलताना गावसकर म्हणाले की, “तो (दीपक चाहर) एक उत्कृष्ट स्विंग गोलंदाज आहे. त्याच्याकडे अतिरिक्त गती आहे. तो एक्स्पर्ट तर नाही, पण चेंडूला योग्य पद्धतीने टाकून फलंदाजांना अडचणीत टाकतो. एक्शनमध्ये बदल न करता चेंडूला दोन्ही दिशेने स्विंग करू शकतो, ज्यामुळे फलंदाजाला खेळताना अडचण येते. भारत वेगवान गोलंदाजांच्या बाबतीत श्रीमंत आहे. कारण त्यांच्याकडे चाहरसारखे गोलंदाज आहेत आणि भुवनेश्वर सारखा गोलंदाज बेंचवर बसलेला आहे.”
जसप्रीत बुमराह वेस्ट इंडीविरुद्धच्या मालिकेत उपस्थित नव्हता. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत त्याने संघात पुनरागमन केले आहे. “बुमराहसुद्धा आहे, त्याला विसरू नका. तो भारतीय संघातच नाही, तर जगातील कोणत्याही संघात जागा बनवू शकतो. त्यानंतर तुमच्याकडे मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी हे सुद्धा आहेत. म्हणजेच पर्यायांची कमतरता नाही.” असे गावसकर पुढे बोलताना म्हणाले.
गावसकरांनी दीपक चाहरचे कौतुक केले असले, तर टी-२० मालिका सुरू होण्यापूर्वी भारतीय संघासाठी एक वाईट बातमी आली. दीपक चाहर आणि सूर्यकुमार यादव हे दोन महत्वाचे खेळाडू टी-२० मालिकेतून बाहेर पडले आहेत. वेस्ट इंडीजविरुद्ध खेळल्या गेलेल्या शेवटच्या टी-२० सामन्यात दीपक चाहर दुखापतग्रस्त झाला होता आणि मैदानातून त्याल बाहेर जावे लागले होते. याच पार्श्वभूमीवर तो या आगामी मालिकेला मुकला आहे. सूर्यकुमार यादवला देखील फ्रॅक्चर असल्याचे सांगितले जात आहे.
महत्वाच्या बातम्या –
‘सर्व ठिक, पण…’, कर्णधार रोहित शर्मा झाला पत्नी रितिकाकडूनच ट्रोल
Video: टीम इंडियाच्या बसमध्ये चढला ‘पुष्पा’ फिवर! चहलसह हे खेळाडू म्हणतायेत, ‘झुकूंगा नही’