---Advertisement---

‘बांगलादेशचे फलंदाज घाबरले’, भारताच्या विजयानंतर असे का म्हणाले गावसकर? घ्या जाणून

On: गुरूवार, नोव्हेंबर 3, 2022 3:49 PM
Sunil-Gavaskar
---Advertisement---

बुधवारी (दि. 02 नोव्हेंबर) ऍडलेड येथे भारत आणि बांगलादेश संघात शानदार सामना पार पडला. या सामन्यात भारताने बांगलादेशला 5 धावांनी पराभूत करत उपांत्य सामन्यातील आपले स्थान जवळपास पक्के केले. शाकिब अल हसन याने या सामन्यात नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. यावेळी भारताने समाधानकारक आव्हान उभे केले, जे पार करताना बांगलादेशच्या नाकी नऊ आले. या सामन्यात बांगलादेशला अपयश आले. यानंतर भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी म्हटले की, हा सामना बांगलादेशने स्वत:च गमावलाय.

माध्यमांशी बोलताना सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी या सामन्याबद्दल प्रतिक्रिया दिली. त्यांना यादरम्यान विचारण्यात आले की, जर पाऊस पडला नसता, तर निकाल वेगळा असता का? यावर गावसकर म्हणाले की, “होय, एकेवेळी असे वाटत होते. त्यांची धावसंख्या 7 षटकात 66 धावा होती. त्यावेळी आम्ही पाहिले की, ते प्रति षटक 9ने धावा चोपत होता. तसेच, याच हिशोबाने त्यांना धावा हव्या होत्या. त्यांच्या हातात 10 विकेट्स होत्या. अचानक आव्हान 33 धावांनी कमी झाले आणि 4 षटकेही. इथेच ते घाबरले.”

पुढे बोलताना ते म्हणाले की, “समंजस्यपणे खेळताना त्यांनी प्रत्येक चेंडूवर षटकार मारण्याचा प्रयत्न केला. त्यांचे लक्ष्य शॉर्ट बाऊंड्रीजवर होते. भारतीय गोलंदाजांनी योग्यप्रकारे गोलंदाजी केली. त्यामुळे जे शॉट बाऊंड्रीच्या दिशेने जायचे, ते मिड विकेट आणि लाँग ऑनवर झेल घेतले जायचे.”

“मला असे म्हणायचे आहे की, बांगलादेशने हा सामना जिंकला जास्त आहे आणि भारत हारला कमी. होय, भारताने स्वत:वर नियंत्रण ठेवले, परंतु बांगलादेशचे फलंदाज घाबरले. त्यांनी खूप जास्त मोठे शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. जर त्यांनी स्मार्ट खेळ दाखवला असता, एक- दोन धावा घेतल्या असत्या, तर त्यांनी प्रति षटक 10च्या हिशोबाने धावा केल्या असत्या.”

या सामन्यात भारतीय संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 6 विकेट्स गमावत 184 धावा चोपल्या. या धावांचा पाठलाग करताना बांगलादेशने वेगवान सुरुवात केली. मात्र, 185 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना उतरलेल्या बांगलादेशकडून लिटन दासने 21 चेंडूत अर्धशतक साकारले. यावेळी बांगलादेशने सात षटकात 66 धावा चोपल्या. यानंतर बांगलादेशने 16 षटकात 151 धावांचे आव्हान मिळाले. मात्र, हे आव्हान पार करताना बांगलादेशला 6 विकेट्स गमावत 145 धावाच करता आल्या. त्यामुळे भारताने हा सामना 5 धावांनी जिंकला.

या विजयासह भारतीय संघ गुणतालिकेत अव्वलस्थानी पोहोचला. भारताचा पुढील सामना रविवारी (दि. 06 नोव्हेंबर) मेलबर्न येथे झिम्बाब्वेविरुद्ध होणार आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारतापाठोपाठ धवनच्या खांद्यावर आयपीएलच्या ‘या’ संघाची जबाबदारी, तुम्हीही म्हणाल, ‘गब्बर छा गये तुम’

पाकिस्तानसाठी दुष्काळात तेरावा महिना, ‘हा’ स्फोटक फलंदाज दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या सामन्यातून बाहेर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---