भारतीय संघाचा माजी फलंदाज आणि राहुल द्रविड याने कसोटी क्रिकेटमध्ये ‘द वॉल’ म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतरही त्याचे क्रिकेटवरचे प्रेम काही कमी झाले नाही. त्याने युवा भारतीय खेळाडूंना घडवण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. तसेच द्रविडच्या मार्गदर्शनाखाली सराव केलेले अनेक खेळाडू, भारतीय संघासाठी महत्वाची भूमिका बजावत आहेत. अशातच भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक आणि ऑस्ट्रेलियन संघाचे माजी क्रिकेटपटू ग्रेग चॅपल यांनी राहुल द्रविड बद्दल भाष्य केले आहे.
ग्रेग चॅपल हे भारतीय संघाचे प्रशिक्षक होते. परंतु त्यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले होते. त्यांचे सौरव गांगुली सोबत मतभेद असल्याच्या बातम्यांना उधाण आले होते. तसेच ते संघात फूट पाडत असल्याच्या देखील अनेक चर्चा रंगू लागल्या होत्या. त्यामुळे त्यांना आपली नोकरी गमवावी लागली होती. ही गोष्ट होऊन अनेक वर्ष उलटली आहेत. आता ग्रेग चॅपल यांनी स्वतःहून राहुल द्रविडचे तोंडभरून कौतुक केल्याचे पाहायला मिळाले आहे.
त्यांनी क्रिकेट.कॉम.एयु ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की,”भारतीय संघाला यश मिळाले आणि हे राहुल द्रविडने आमच्याकडुन शिकून घेतले म्हणून शक्य झाले. त्याने पाहिले की,आम्ही काय करतो. हेच पाहून त्याने भारतातही त्याचा अवलंब केला. त्याच्याकडे जास्त पर्याय उपलब्ध होते.” तसेच ते पुढे म्हणाले की, “ऐतिहासिक दृष्टया आम्ही युवा खेळाडूंना घडावण्यामध्ये अव्वल होतो. परंतु माझ्या मते, गेल्या काही महिन्यात या गोष्टींमध्ये बदल आले आहेत. मी अनेक खेळाडूंना पहिले ज्यांच्याकडे कौशल्य आहे. परंतु त्यांना खेळण्याची संधी मिळत नाहीये. ”
भारतीय संघाने २०२१ च्या सुरुवातीला, ऑस्ट्रेलिया संघाला त्यांच्याच देशात जाऊन पराभूत केले होते. या मालिकेतून विराट कोहलीने देखील माघार घेतली होती. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ३-१ ने मालिका आपल्या नावावर केली होती. यात युवा खेळाडूंनी आपल्या कामगिरीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. याबाबत बोलताना ग्रेग चॅपल म्हणाले की,”जर आपण ब्रिस्बेन कसोटीत खेळणाऱ्या भारतीय संघाकडे पहिले तर, या संघात ३-४ युवा खेळाडू होते. सर्वांनी असे देखील म्हटले होते की, हा भारताचा दुसरा संघ आहे. या संघाने भारतीय अ संघासाठी अनेक सामने खेळले आहेत. भारतातच नव्हे तर वेगवेगळ्या परिस्थितीत या युवा खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. म्हणून जेव्हा त्याची निवड झाली तेव्हा ते नवखे नसून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू होते.”
महत्त्वाच्या बातम्या –
श्रीलंका दौरा निश्चित असतांना इंग्लंड दौऱ्यासाठी का निवडले हे खेळाडू? बीसीसीआयवर होते आहे टीका
आता बहुधा फक्त भारतीय खेळाडूच खेळणार उर्वरित आयपीएल हंगाम, या कारणामुळे बीसीसीआयच्या अडचणीत वाढ
कसोटी क्रमवारीत भारताने कायम राखले अव्वल स्थान, या संघांची झाली घसरण