आयसीसीने नुकतीच सांघिक कसोटी क्रमवारी जाहीर केली. यात भारतीय संघाने वर्चस्व गाजवताना अव्वल स्थान कायम राखले राखले आहे. तर न्यूझीलंडचा संघ या क्रमवारीत दुसर्या स्थानी कायम आहे. विशेष म्हणजे याच दोन अव्वल संघांमध्ये आगामी जून महिन्यात विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. मात्र या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाची घसरण झाली आहे.
संपूर्ण क्रमवारी –
आयसीसीने नुकत्याच जाहीर केलेल्या या क्रमवारीत भारतीय संघ अव्वल स्थानी असून त्यांचे १२१ रेटिंग गुण आहेत. त्यांच्या पाठोपाठ न्यूझीलंडचा संघ आहे. त्यांच्या नावे १२० रेटिंग गुण आहेत. म्हणजेच अव्वल स्थानावरील भारत आणि दुसर्या स्थानावरील न्यूझीलंड यांच्यात केवळ एका गुणाचा फरक आहे. या क्रमवारीत इंग्लंडने एका स्थानाने सुधारणा केली आहे. त्यांनी १०९ रेटिंग गुणांसह तिसरे स्थान गाठले आहे.
मात्र इंग्लंडच्या प्रगतीमुळे ऑस्ट्रेलियाची घसरण झाली आहे. ऑस्ट्रेलियन संघ १०८ रेटिंग गुणांसह चौथ्या स्थानी आला आहे. त्यांच्यानंतर पाकिस्तानचा संघ ९४ रेटिंग गुणांसह पाचव्या स्थानी आहे. तर वेस्ट इंडिजने दोन स्थानांनी प्रगती करत सहावे स्थान गाठले आहे. त्यांचे ८४ रेटिंग गुण आहेत. आश्चर्यकारकपणे दक्षिण आफ्रिकेचा संघ या क्रमवारीत चक्क सातव्या स्थानी आहे. तर श्रीलंका, बांगलादेश आणि झिम्बाब्वे अनुक्रमे आठव्या, नवव्या आणि दहाव्या क्रमांकावर आहेत. या व्यतिरिक्त आयर्लंड आणि अफगाणिस्तान देखील कसोटी सामने खेळणारे देश आहेत. मात्र अद्याप क्रमवारीत सामील होण्याइतके सामने त्यांनी न खेळल्यामुळे यात त्यांचा समावेश नाही.
https://twitter.com/ICC/status/1392707607689793536
भारत आणि न्यूझीलंड भिडणार विजेतेपदासाठी
दरम्यान, या क्रमवारीत अव्वल दोन स्थानी असलेले भारत आणि न्यूझीलंडचे संघ आगामी जून महिन्यात आमनेसामने असतील. विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद पटकावण्यासाठी हे दोन्ही संघ प्रयत्न करतील. इंग्लंडमधील साउथम्पटनच्या एजेस बाउल या मैदानावर १८ ते २२ जून दरम्यान हा सामना खेळवला जाईल. दोन्ही देशांनी यासाठी आपापले संघ जाहीर केले असून ते लवकरच इंग्लंड मध्ये दाखल होतील.
महत्त्वाच्या बातम्या –
विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना अनिर्णित राहिला तर काय होणार? वाचा आयसीसीचा नियम
फिरकी गोलंदाज असून मार्नस लॅबुशेनने टाकला चक्क वेगवान बाउन्सर, पाहा भन्नाट व्हिडिओ
पाकिस्तानी खेळाडू मोहम्मद आमिर खेळणार आयपीएल? पाहा कसे आहे शक्य





