येत्या ऑगस्ट महिन्यात भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांचा थरार रंगणार आहे. ही मालिका सुरू होण्यापूर्वी भारत आणि सिलेक्ट काउंटी इलेव्हन या दोन्ही संघांमध्ये सराव सामना पार पडला, जो अनिर्णीत राहिला आहे. परंतु या सामन्यादरम्यान भारतीय संघातील २ खेळाडू आवेश खान आणि वॉशिंग्टन सुंदर हे दुखापतग्रस्त झाले आहेत. तसेच विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर शुबमन गिल देखील दुखापतग्रस्त असल्याचे आढळून आले होते. त्यामुळे हे तिघेही खेळाडू इंग्लंड संघाविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेतून बाहेर झाले आहेत. त्यामुळे आगामी इंग्लंड दौऱ्यावर कोणाला संधी देण्यात यावी? याबाबत दीप दास गुप्ता यांनी भाष्य केले आहे.
आपल्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना माजी भारतीय क्रिकेटपटू दीप दासगुप्ता यांनी म्हटले की, “आवेश खान जरी नेट गोलंदाज असला तरीही तो बाहेर झाल्यानंतर भुवनेश्वर कुमार आणि दीपक चाहर यांना इंग्लंडला पाठवण्याची उत्तम संधी आहे. दोघेही स्विंग गोलंदाज आहेत आणि चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. अशा फॉर्ममध्ये ते इंग्लिश परिस्थितीचा पुरेपूर फायदा घेऊ शकतात. ते पांढरा चेंडू स्विंग करत आहेत. तर इंग्लंडमध्ये ड्यूक चेंडू नक्कीच स्विंग करू शकतात.”
“गेल्या काही महिन्यांपासून सलामी फलंदाज म्हणून कोण खेळेल यावर देखील चर्चा सुरू आहे. माझ्या मते पृथ्वी शॉ यासाठी योग्य असेल. तिथे अभिमन्यु ईश्वरन, मयंक अगरवाल आणि रोहित शर्मा आहेत. परंतु पृथ्वी शॉ ला पाठवणे चुकीचे ठरणार नाही,” असेही ते म्हणाले. (Former Indian cricketer deepdas gupta said Bhuvneshwar Kumar and Deepak chahar will be good choice to send England as replacement he also support Prithvi shaw)
‘टाइम्स टीम इंडिया’च्या वृत्तानुसार, भुवनेश्वर कुमारला इंग्लंडला पाठवण्याबाबत विचार केला जात आहे. भारतीय संघाने यापूर्वी पृथ्वी शॉ आणि देवदत्त पडिक्कल यांना इंग्लंडला पाठवण्याचा प्रस्ताव ठेवला होता. परंतु बोर्डने तो फेटाळून लावला होता. श्रीलंकेहून खेळाडूंना इंग्लंडला पाठवणे बीसीसीआयसाठी सोपे नसेल. परंतु असा अंदाज आहे की, श्रीलंका दौऱ्यातील इंग्लंडला जाणारा खेळाडू भुवनेश्वर कुमारच असेल.
इंग्लंडविरुद्धची पाच सामन्यांची कसोटी मालिका
पहिली कसोटी- ४ ते ८ ऑगस्ट, नॉटिंघम
दुसरी कसोटी- १२ ते १६ ऑगस्ट, लॉर्ड्स
तिसरी कसोटी- २५ ते २९ ऑगस्ट, लीड्स
चौथी कसोटी- २ ते ६ सप्टेंबर, द ओव्हल
पाचवी कसोटी- १० ते १४ सप्टेंबर, मॅनचेस्टर
महत्त्वाच्या बातम्या-
विराटचा ‘तो’ फोटो शेअर करत २०१८ च्या इंग्लंड दौऱ्यातील आठवणींना उजाळा; दिले मन जिंकणारे कॅप्शन
तेव्हा शोएब अख्तर अनुष्काला म्हणाला होता, ‘विराट कर्णधार बनून मोठी चूक करत आहे’
कन्फ्युजन ही कन्फ्युजन! बाद नसतानाही सूर्यकुमार चालू लागला होता तंबूची वाट, जाणून घ्या पूर्ण प्रकरण