मागील एक वर्षापासून भारतासह पूर्ण जग कोविड-१९ या जागतिक महामारीशी लढा देत आहे. या महामारीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सध्या भारतात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. या टप्प्यात ६० वर्षांवरील नागरिकांना आणि ४५ वर्षांवरील नागरिकांना लस दिली जात आहे. तसेच ज्यांना आजाराची जास्त भीती आहे, त्यांनादेखील ही लस दिली जात आहे. दरम्यान भारताचे पहिले विश्वविजेते कर्णधार आणि माजी अष्टपैलू कपिल देव यांनीही या लसीचा पहिला डोस घेतला आहे.
बुधवारी (०३ मार्च) दिल्लीच्या फोर्टिस रुग्णालयात कपिल देव यांना कोरोनाची लस देण्यात आली. न्यूज एजन्सी एएनआयने त्यांचा लस टोचून घेतानाचा फोटो शेअर केला आहे.
कपिल देव यांच्यापुर्वी माजी भारतीय फलंदाज संदीप पाटील, मदनलाल यांनीही या लसीचा पहिला डोस घेतला आहे. याबरोबरच भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींनीही कोरोना लस घेतली आहे.
शास्त्री सध्या भारतीय संघासोबत अहमदाबादमध्ये आहेत. त्यांनी भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटीआधी अहमदाबादच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये कोरोना लस टोचून घेतली. याबद्दल खुद्द शास्त्रींनीच ट्विटरवरुन माहिती दिली होती. शास्त्रींनी कोरोन लस टोचून घेतानाचा फोटो पोस्ट केला होता.
Delhi: Veteran cricketer Kapil Dev received his first dose of #COVID19Vaccine at Fortis Hospital today. pic.twitter.com/Gpn5vMRz39
— ANI (@ANI) March 3, 2021
In the fight against Covid -19 .. im vaccine strong!!! "Proud to get the Jab ". Organized and well handled at Jeewan hospital and nursing home !!! pic.twitter.com/Ur70FSxOyh
— Madan Lal (@MadanLal1983) March 2, 2021
Got the first dose of COVID-19 vaccine. Thank you to the amazing medical professionals & scientists for empowering India 🇮🇳 against the pandemic.
Extremely impressed with the professionalism shown by Kantaben & her team at Apollo, Ahmedabad in dealing with COVID-19 vaccination pic.twitter.com/EI29kMdoDF
— Ravi Shastri (@RaviShastriOfc) March 2, 2021
तसेच ट्विटमध्ये लिहिले होते की ‘कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. भारतातील वैद्यकिय क्षेत्राचे आणि शास्त्रज्ञांचे आभार, त्यांनी भारताला या रोगाविरुद्ध सशक्त बनवले आहे. अपोलो, अहमदाबाद येथे कांताबेन आणि तिच्या टीमने दर्शविलेल्या व्यावसायिकतेमुळे अत्यंत प्रभावित झालो आहे.”
महत्त्वाच्या बातम्या-
INDvsENG : कुठे व केव्हा होणार चौथा कसोटी सामना; जाणून घ्या सर्वकाही
वनक्कम ‘थाला’! एमएस धोनीचे आयपीएलसाठी चेन्नईत आगमन, पाहा फोटो