Thursday, March 23, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

“आता त्याला विसरा” विश्वविजेत्या खेळाडूने बुमराहच्या कारकिर्दीवरच लावले प्रश्नचिन्ह

March 3, 2023
in टॉप बातम्या
Jasprit Bumrah

Photo Courtesy: Instagram/jasprit bumrah


भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा मोठ्या काळापासून कोणत्याही प्रकारचे क्रिकेट खेळलेला नाही. पाठीच्या दुखण्यामुळे तो आता आगामी आयपीएलला देखील मुकणार आहे. तसेच, पुनरागमनासाठी जवळपास सप्टेंबर महिन्यापर्यंत वाट पहावी लागू शकते. दुखापतीमुळे आता भारताचे माजी विश्वविजेता क्रिकेटपटू मदनलाल यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे.

बुमराह मार्च महिन्याच्या अखेरीस सुरू होत असलेल्या आयपीएलमधून पुनरागमन करण्याची चर्चा सुरू होती. मात्र, काही दिवसांपूर्वीच आलेल्या वृत्तानुसार, बुमराह दुखापतीतून पूर्णपणे सावरला नसल्याने आयपीएल व त्यानंतर जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत खेळणार नाही. यादरम्यानच त्याच्यावर सर्जरी होणार असल्याने तो आशिया चषकात देखील सहभागी होण्यावर साशंकता निर्माण झाली आहे. या मुद्द्यावर आता भारताचे माजी क्रिकेटपटू मदनलाल यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले,

“भारतीय संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात पात्र ठरण्याची शक्यता आहे. तिथे तुम्हाला तीन वेगवान गोलंदाज आवश्यक असतील. मोहम्मद शमी व मोहम्मद सिराज यांच्यासोबत उमेश यादव भारताचा तिसरा वेगवान गोलंदाज असेल. मी तर इथपर्यंत म्हणेल की, तुम्ही आता जसप्रीत बुमराहला विसरा. तो ज्यावेळी येईल त्यावेळी पाहून घेऊ. तो कधी येईल हे माहित नाही. त्याला किती दिवस लागतील? त्याऐवजी तुमच्याकडे जे खेळाडू उपलब्ध आहेत त्यांच्याकडून चांगली कामगिरी करून घ्या.”

‌बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे आशिया चषक व टी20 विश्वचषक या महत्त्वाच्या स्पर्धा तो खेळू शकला नव्हता. त्यानंतर आता सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतून तसेच आगामी वनडे मालिकेतून त्याने माघार घेतलेली. त्यानंतर आता बीसीसीआयने त्याला सर्जरी करण्याचा सल्ला दिला आहे.

(Former Indian Cricketer Madanlal Said Now Forget Jasprit Bumrah)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘या’ पंजाबी अभिनेत्रीवर आख्खं पाकिस्तान फिदा, पीएसएलमधील सामन्यादरम्यान चाहत्याची पोस्टरसोबत एन्ट्री
आदिल रशीदचा नाद पराक्रम! बांगलादेशविरुद्ध 4 विकेट्स घेताच ब्रॉडच्या विक्रमही काढला मोडीत, रेकॉर्ड पाहाच


Next Post
fOOTBALL

आमदार चषक स्पर्धेसाठी 16 संघ; शासकीय पॉलिटेक्निक मैदानावर होणार स्पर्धा

Shane Warne

'लिजेंड वॉर्नी'चा शेवट झाला तरी कसा? क्रिकेटचा भरभरून आनंद दिलेला शेन वॉर्न जाताना मात्र सर्वांनाच चटका लावून गेला, वाचा

Spinner-Shane-Warne

शेन वॉर्नच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ; सर्वांपासून लपून रडायचा 'शतकातील सर्वोत्तम चेंडू' टाकणारा फिरकीपटू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143