---Advertisement---

VIDEO | एक टप्पा आउट! कुटुंबातील लहान सदस्यांना शेवटपर्यंत नाही बाद झाला मोहम्मद कैफ

On: शुक्रवार, जुलै 22, 2022 11:38 AM
Mohammad-Kaif
---Advertisement---

भारतीय संघाचा माजी फलंदाज मोहम्मद कैफने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओत कैफ त्याच्या घरी कुटुंबातील लहान मुलांसोबत क्रिकेट खेळताना दिसत आहे. व्हिडिओत कैफ त्याच्या जुन्या अंदाजात फलंदाजी करताना दिसत आहे आणि कुटुंबातील लहान सदस्यांना त्याची विकेट लवकर घेता येत नाहीये. 

मोहम्मद कैफ (Mohammad Kaif) आणि त्याच्या कुटुंबातील सदस्य ज्या पद्धतीने क्रिकेट खेलत आहेत, त्याला आपण ‘एक टप्पा आउट’ म्हणू शकतो. फलंदाजाने जर चेंडू खेळला आणि तो एक टप्पा पडून क्षेत्ररक्षकाने एका हातात पकडला, तर फलंदाज बाद, असा नियम कैफ व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगतो. या नियमामुळे फलंदाजाला बात करणे सोपे असले तरी, कैफच्या कुटुंबातील लहान मुले त्याला व्हिडिओच्या शेवटपर्यंत बाद करू शकत नाहीत.

कैफने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून हा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यावर चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्स येत आहेत. व्हिडिओच्या कॅप्शनची खास चर्चा होत आहे. कॅप्शनमध्ये त्याने लिहिले की, “जेव्हा संपूर्ण जग मला बाद करण्याच्या प्रयत्नात असते.” कॅप्शनसोबत त्याने स्माईलीच्या इमोजी देखील पोस्ट केल्या आहेत. व्हिडिओवर आतापर्यंत आठ हजारपेक्षा जास्त लाईक्स आल्या आहेत.

https://www.instagram.com/reel/CgOfeuAoJos/?utm_source=ig_web_copy_link

दरम्यान, भारतीय संघाच्या या ४१ वर्षी माजी दिग्गजाच्या क्रिकेट कारकिर्दीचा विचार केला, तर त्याने एकूण १३ कसोटी सामने खेळले आहेत. या कसोटी सामन्यांमध्ये कैफला २२ वेळा फलंदाजीची संधी मिळाली आणि त्याने ३२.८ च्या सरासरीने ६२४ धावा केल्या. कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर एक शतक आणि तीन अर्धशतक आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने भारतीय संघासाठी एकूण १२४ सामन्यांचे प्रतिनिधित्व केले. या सामन्यांपैकी ११० सामन्यांमध्ये त्याला फलंदाजीची संधी मिळाली, ज्यामध्ये ३२.० च्या सरासरीने २७५३ धावा केल्या. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नाववर एक शतक आणि १३ अर्धशतकांची नोंद आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या – 

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलींनी घेतला थेट निर्णय, ‘आता आशिया चषक…..’

‘जशी संघाची बेंच स्ट्रेंथ महत्वाची आहे, तशीच प्रशिक्षकांची…’, एनसीएचे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण यांचे मोठे विधान

‘भारतीय संघ युवा असेल तरी….’ वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यापूर्वीच कर्णधार शिखर धवनने दिला कानमंत्र

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---