विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्यात युवा सलामीवीर फलंदाज शूबमन गिल याने भारतीय संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. परंतु तो मोठी खेळी खेळण्यास अपयशी ठरला होता. हा सामना होऊन काही दिवस झाल्यानंतर त्याची दुखापतीची बातमी समोर आली आहे, ज्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. अशातच माजी भारतीय क्रिकेटपटू सबा करीम यांनीही शुबमन गिलवर टीका केली आहे. (Former Indian cricketer saba Karim raised question on Shubman gill fitness)
शुबमन गिलची दुखापतीची बातमी समोर आल्यानंतर अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी प्रश्न उपस्थित केले आहेत. अशातच माजी भारतीय क्रिकेटपटू सबा करीम यांनी देखील टीका करत म्हटले की, “शुबमन गिलने आपली दुखापतीची बातमी लपवून ठेवणे आश्चर्यकारक होते. तो गेल्या अनेक महिन्यांपासून भारतीय संघासोबत प्रवास करत आहे. तसेच खेळाडूंवर लक्ष ठेवण्यासाठी फिजीओ आणि मेडिकल टीम आहे. खरं तर हे खूप आश्चर्यकारक आहे. हे यापूर्वी समोर का आले नाही?”
मयंक अगरवालला संधी द्या
भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज मयंक अगरवाल याला गेल्या काही महिन्यांपासून भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी कसरत करावी लागत आहे. मयंक अगरवालबाबत भाष्य करताना सबा करीम म्हणाले, “मयंकला संधी दिली गेली पाहिजे. त्याच्याविरुद्ध नेहमी कठोर निर्णय घेतले गेले आहेत. २-३ डावात फ्लॉप ठरल्यानंतर त्याला संघाबाहेर करण्यात आले होते.”
मयंक अगरवालला २०२०-२१ बॉर्डर गावसकर ट्रॉफी झाल्यानंतर, खूप कमी वेळेस संघात खेळण्याची संधी मिळाली आहे. अशातच माजी भारतीय क्रिकेटपटू निखिल चोपडा यांनी म्हटले की, “मयंकला आगामी कसोटी मालिकेत संधी मिळायला हवी.” ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना ४ ऑगस्टपासून सुरू होणार आहे.
इंग्लंडविरुद्धची पाच सामन्यांची कसोटी मालिका
पहिली कसोटी- ४ ते ८ ऑगस्ट, नॉटिंघम
दुसरी कसोटी- १२ ते १६ ऑगस्ट, लॉर्ड्स
तिसरी कसोटी- २५ ते २९ ऑगस्ट, लीड्स
चौथी कसोटी- २ ते ६ सप्टेंबर, द ओव्हल
पाचवी कसोटी- १० ते १४ सप्टेंबर, मॅनचेस्टर
महत्वाच्या बातम्या –
‘रनमशीन’ विराटची पत्नी अनुष्काही बनणार क्रिकेटपटू, पण रुपेरी पडद्यावर; ‘या’ खेळाडूची साकारणार भूमिका
सुरुवातीला साक्षी धोनीला नव्हते आवडत क्रिकेट; माहीच्या ‘या’ ३ गोष्टींमुळे बनली क्रिकेटची चाहती
धोनीच्या संगतीत ‘या’ अष्टपैलूचे पालटले नशीब, आता संघाला जिंकून देणार टी२० विश्वचषक