---Advertisement---

“यंदाची चॅम्पियन्स ट्रॉफी रोहित शर्मासाठी शेवटची आयसीसी स्पर्धा” माजी क्रिकेटपटूची मोठी भविष्यवाणी

On: रविवार, फेब्रुवारी 23, 2025 1:29 PM
---Advertisement---

यंदाच्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा (ICC Champions Trophy 2025) रंजक प्रवास सुरूच आहे. या मेगा स्पर्धेत, आज (23 फेब्रुवारी) भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात अटीतटीची लढत पाहायला मिळेल. दुबईमध्ये होणाऱ्या या हायव्होल्टेज लढाईसाठी दोन्ही संघ सज्ज आहेत. त्यामुळे दोन्ही संघांसोबतच, क्रिकेट जगतातील चाहतेही सामन्यावर लक्ष ठेवून आहेत.

या ब्लॉकबस्टर सामन्याच्या अगदी आधी, माजी भारतीय क्रिकेटपटू संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माबद्दल (Rohit Sharma) एक आश्चर्यकारक वक्तव्य केले आहे.

माजी भारतीय क्रिकेटपटू आणि समालोचक संजय मांजरेकर यांनी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माबद्दल एक मोठी भविष्यवाणी केली आहे. त्यांचा असा विश्वास आहे की 2025ची आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी रोहित शर्मासाठी शेवटची आयसीसी स्पर्धा असू शकते. मात्र, मांजरेकर यांनी रोहित शर्माच्या फलंदाजीच्या शैलीचे कौतुक केले. पण 37 वर्षीय खेळाडूसाठी, त्याने कबूल केले आहे की 2027चा वनडे विश्वचषक एक कठीण संधी आहे.

ईएसपीएन क्रिकइन्फोनशी बोलताना मांजरेकर म्हणाले, “मला वाटतं जर त्यांनी निर्णय घेतला असेल, तर रोहित शर्मा 2027च्या क्रिकेट विश्वचषकासाठी तिथे असू शकेल का? मला वाटत नाही की ते होईल, खूप कमी. तुम्ही सुचवत आहात तसे, त्याच्यासाठी ही शेवटची आयसीसी स्पर्धा असू शकते. पण मला आशा आहे की रोहित शर्मा तिथे जाईल आणि तो खरोखरच काळजीत नसेल, तो त्याचा शेवटचा सामना आहे की काहीही, परंतु त्याच्याकडे खूप दर्जेदार फलंदाजी आहे याची काळजी करेल.”

पुढे बोलताना ते म्हणाले, “2023च्या विश्वचषकात रोहित शर्माची लोकप्रियता गगनाला भिडली. मला रोहित शर्माबद्दल आवडणारी गोष्ट म्हणजे तो कर्णधार निस्वार्थी होता, मैदानावर उतरायचा. तो शतक करू शकला असता, पण त्याऐवजी त्याने संघाला एक उत्तम सुरुवात दिली आणि त्याच्या नंतर येणाऱ्या खेळाडूंसाठी गोष्टी सोप्या केल्या.”

महत्त्वाच्या बातम्या-

दुबईत नाणेफेक म्हणजे अर्धी लढाई जिंकली! IND vs PAK सामन्यापूर्वी महत्त्वाची आकडेवारी समोर
IND vs PAK: क्रिकेट भक्ती.! भारताच्या विजयासाठी देशभरात होमहवन-पूजाअर्चा
Masters League; वयाच्या 43 व्या वर्षी युवराज सिंगने घेतला सुपरमॅन कॅच, पाहा VIDEO

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---