आशिया चषक 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत विरुद्ध श्रीलंका संघ आमने- सामने आहेत. रविवारी (दि. 17 सप्टेंबर) कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडिअम येथे खेलळ्या जाणाऱ्या या सामन्याकडे संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे. अशात भारतीय संघाचा माजी सलामीवीर फलंदाज आणि क्रिकेट एक्सपर्ट आकाश चोप्रा याने अंतिम सामन्यासाठी भारताची प्लेइंग इलेव्हन निवडली आहे. त्याने आपल्या संघात त्या सर्व खेळाडूंना जागा दिली आहे, ज्यांना बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्मा याने विश्रांती दिली होती.
भारतीय संघ पाकिस्तान आणि श्रीलंका संघांना पराभूत करत आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचला होता. असात भारताचा बांगलादेशविरुद्धचा सामना औपचारिक होता. त्या सामन्यात इतर खेळाडूंना संधी देण्यासाठी कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने प्लेइंग इलेव्हनमध्ये (Playing 11) 5 बदल केले होते. मात्र, अक्षर पटेल दुखापतग्रस्त झाल्यामुळे रोहितला अर्धा डझन बदल करावे लागू शकतात.
आकाश चोप्राची भारतीय प्लेइंग इलेव्हन (Aakash Chopra Indian Playing XI)
आकाश चोप्रा याने त्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कर्णधार रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांना सलामीवीर म्हणून निवडले आहे. याव्यतिरिक्त त्याने तिसऱ्या क्रमांकासाठी विराट कोहली (Virat Kohli) आणि चौथ्या क्रमांकासाठी केएल राहुल यांना निवडले. त्याने पाचव्या क्रमांकावर ईशान किशनला जागा दिली आहे. त्याने पाकिस्तानविरुद्धच्या साखळी फेरीत शानदार कामगिरी केली होती.
याव्यतिरिक्त चोप्राने हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांना अष्टपैलूच्या रूपात निवडले आहे. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यादरम्यान अक्षर पटेल दुखापतीमुळे अंतिम सामन्यातून बाहेर पडला आहे. त्याचा पर्याय म्हणून सुंदरला संघात जागा मिळाली आहे. श्रीलंका अंतिम सामन्यासाठी फिरकी खेळपट्टी बनवण्यावर जास्त भर देईल. अशात सुंदरची भूमिका महत्त्वाची ठरेल.
दुसरीकडे, गोलंदाजांबद्दल बोलायचं झालं, तर चोप्राने जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांच्या रूपात दोन वेगवान गोलंदाज घेतले. तसेच, फिरकी तज्ज्ञाच्या रूपात कुलदीप यादवलाही संघात जागा दिली. चोप्राने त्याच्या संघात मागील सामन्यात चांगली गोलंदाजी करणाऱ्या मोहम्मद शमी आणि शार्दुल ठाकूर यांना जागा दिली नाहीये.
आशिया चषक 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी आकाश चोप्राची भारतीय प्लेइंग इलेव्हन-
रोहित शर्मा, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ईशान किशन, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज. (former indian cricketer selected indian playing 11 for india vs sri lanka asia cup final know here)
हेही वाचा-
Asia Cup Finalपूर्वी लगेच जाणून घ्या कसंय हवामान, IND vs SL सामन्यावेळी पडणार का पाऊस?
भुवनेश्वर, प्रवीण कुमारचा गाववाला सुदीप त्यागी, भारताकडून खेळला फक्त 4 वनडे अन् 1 टी20