भारतीय संघातील डाव्या हाताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा गेल्या काही सामन्यांपासून संघाबाहेर आहे. याचे कारण असे की, भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना तिसऱ्या कसोटी सामन्यात जडेजाच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. त्यानंतर ऑस्ट्रेलियामध्येच त्याच्या अंगठ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. यानंतर नुकताच जडेजा एनसीएमध्ये सराव करताना आढळून आला होता. अशातच, संघात पुनरागमन करण्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या जडेजाबद्दल माजी भारतीय क्रिकेटपटू सुनिल गावसकर यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
नुकत्याच पार पडलेल्या भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेत, भारतीय संघाने ३-१ ने विजय मिळवला आहे. या मालिकेत जडेजाच्या जागी संधी मिळालेल्या युवा गोलंदाज अक्षर पटेलने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तीन सामन्यात त्याने तब्बल २७ गडी बाद केले आहेत. याबाबत भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू गावसकर यांनी म्हटले आहे की, “जी संधी पटेलला मिळाली त्या संधीचे त्याने सोने केले. आता जडेजाचे संघात पुनरागमन करणे कठीण आहे ”
दोन खेळाडूंची एकाच स्थानासाठी लढत पाहून बरे वाटले
गावसकर पुढे म्हणाले, “अक्षरने २७ गडी बाद केले. तसेच उत्कृष्ट फलंदाजीदेखील केली. यासोबतच तो उत्कृष्ट क्षेत्ररक्षकदेखील आहे. परंतु तो जडेजा इतका चपळ क्षेत्ररक्षक नाही. असे असले तरीही जडेजासाठी संघात पुनरागमन करणे कठीण असणार आहे. कारण, त्याने मागील काही काळात जास्त क्रिकेटही नाही खेळले आहे. भारतीय संघदेखील अक्षरला सोबत ठेवण्याचा विचार करत असेल. हे पाहून बरे वाटते की, दोन खेळाडू एकाच स्थानासाठी लढत आहेत.”
महत्त्वाच्या बातम्या-
थाला इज बॅक! विरोधी संघांची उडाली झोप, धोनीने सुरू केली आयपीएलची तयारी; पाहा फोटो
“विश्वास ठेवा, तो नक्कीच धावा करेल,” खराब फॉर्ममध्ये असलेल्या शुबमनचा भारतीय दिग्गजाकडून बचाव
बॅटिंग-बॉलिंग एकच नंबर, इंग्लंड विरोधात मैदानात उतरण्यापुर्वी हार्दिकचा कसून सराव; Video व्हायरल






