जून महिन्यात भारत आणि न्यूझीलंड हे बलाढ्य संघ एकमेकांशी भिडणार आहेत. द रोज बाउल स्टेडियम, साउथम्पटन येथे या उभय संघांमध्ये जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. तत्पुर्वी आजी-माजी खेळाडूंनी या सामन्याबद्दल, दोन्ही संघाच्या निवडीबद्दल, खेळाडूंबद्दल आपल्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे.
परंतु इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याच्यावर निशाणा साधला. यावर माजी भारतीय फलंदाज वसिम जाफर याने वॉनला सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.
जाफरने बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशन याचे नाव वापरत वॉनला तिखट प्रत्युत्तर दिले. आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटद्वारे ट्विट करत त्याने लिहिले की, ‘जास्तीच बोट ऋतिक रोशनला आहे. परंतु काड्या नेहमीच मायकल वॉन करत असतो.’
https://twitter.com/WasimJaffer14/status/1393188115766931467?s=20
काय म्हटले होते मायकल वॉनने?
नेहमी आपल्या तिखट प्रतिक्रियेमुळे वादाला आमंत्रण देणाऱ्या वॉनने भारताचा कर्णधार विराट आणि न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन यांची तुलना केली होती. त्याने स्पार्क स्पोर्टशी बोलताना म्हटले होते की, “जर केन विलियम्सन भारतीय असता तर तो जगातील सर्वश्रेष्ठ क्रिकेटपटू असता. परंतु विराट कोहली असताना कधीही असे म्हटले जाणार नाही. कारण विलियम्सन हा भारतीय नाहीये. तुम्ही विराट महान क्रिकेटपटू नाही असे म्हणू शकत नाही. कारण असे केल्यास तुम्हाला सोशल मीडियावर लोकांच्या रागाचा सामना करावा लागेल. काही लोक मुद्दाम लाईक्स, क्लिक किंवा सबस्काइबर वाढवण्यासाठी विराटला महान म्हणत असतात.’
“माझ्या मते विलियम्सन हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही स्वरुपात समान कामगिरी करतो. तो मैदानावर शांत आणि संयमी होऊन खेळतो. तो खरोखरोच कमालीचा खेळाडू आहे,” असे तो पुढे म्हणाला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
सध्याचा खराब फॉर्म अन् इंग्लंडमधील चिंताजनक आकडेवारी, रहाणेला WTC Finalमध्ये जागा मिळणार का?
‘पृथ्वी शॉवर दुर्लक्ष करणं बर नव्हे, तो विरेंद्र सेहवागसारखा फलंदाज आहे,’ माजी निवडकर्त्याचा पाठिंबा
मॅन विथ गोल्डन हार्ट! ‘धन्यवाद अण्णा, तू एक जीव वाचवलास’; मध्यरात्री पिडीताच्या मदतीला धावला विहारी






