माजी भारतीय क्रिकेटपटू आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर याचा जवळचा मित्र विनोद कांबळी सध्या आर्थिक तंगीतून जात आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर तो बीसीसीआयकडून मिळणाऱ्या निवृत्ती वेतनावर आपले घर चालवत आहे. काही दिवसांपूर्वीच आपल्याला कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी नोकरीची आवश्यकता असल्याचे त्याने म्हटले होते. आता एका मराठी उद्योजकाने त्याला मदतीचा हात दिला आहे.
मुंबईस्थित सह्याद्री उद्योगसमूहाच्या फायनान्स कंपनीचे चेअरमन संदीप थोरात यांनी कांबळीला दर महा एक लाख रुपये पगाराची नोकरी देऊ केली आहे. अर्थात तो वर्षभरात 12 लाख कमवेल. आता कांबळी सह्याद्री मल्टिसिटी फायनान्स कंपनीच्या मुंबई शाखेत मानद संचालक म्हणून काम पाहणार आहे.
कांबळीची परिस्थिती पाहून हळहळले थोरात
कांबळीने आपल्यावर ओढावलेल्या नामुष्कीबाबत बोलताना सांगितले होते की, “मी सध्या मोठ्या संकटात सापडलो आहे. माझ्या हाताशी काम नाही. मला बीसीसीआयकडून मासिक 30,000 रुपये मिळतात त्यावरच मी उदरनिर्वाह करतोय. कृपया, मुंबई क्रिकेट असोसिएशनने मला प्रशिक्षणातील काहीतरी काम द्यावे. मला सचिन तेंडुलकरने नोकरी देऊन मदत केली होती. मात्र, आरोग्याच्या समस्येमुळे मला ती नोकरी सोडावी लागली. त्याला सर्व परिस्थिती माहीत आहे पण मी त्याला आता काहीही मागू शकत नाही. त्याने मला शक्य तितकी मदत केली आहे.”
थेट घरी जाऊन दिली नोकरीची ऑफर
त्याच्या या परिस्थितीमुळे अनेकांनी हळहळ व्यक्त केली होती. त्यानंतर महाराष्ट्रातील एक उद्योगपती संदीप थोरात यांनी त्याला मदतीचा हात देऊ केला होता. मुंबईस्थित सह्याद्री उद्योगसमूहाच्या फायनान्स कंपनीत एक लाख रुपये पगाराच्या नोकरीची ऑफर त्यांनी कांबळीला दिली होती. या ऑफरनंतर बरेच दिवस कांबळीने ही नोकरी स्विकारली की नाही?, याबाबत माहिती समोर आली नव्हती. पण, आता सह्याद्री मल्टिसिटी फायनान्स कंपनीचे चेअरमन थोरात यांनी कांबळीला थेट त्याच्या घरी जावून ऑफर लेटर दिले. त्यानंतर कांबळीने थोरात यांची नोकरीची ऑफर आपण स्विकारली असल्याचे सांगितले आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
Breaking: विंडीजचा दिग्गज ब्रायन लारा मुख्य प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार, आयपीएल विजेत्या संघाला करणार मार्गदर्शन
PAKvsHK | 8 2 0 6 1 4 3 3 0 1 0.. हा कोणाचा मोबाईल नंबर नसून आहे हाँगकाँगची धावसंख्या
मराठीत माहिती- क्रिकेटर मोहम्मद शमी