---Advertisement---

आरसीबीविरुद्ध रिषभची कॅप्टन्सी पाहून दिग्गजाचा चढला पारा; म्हणाला, ‘त्याला १० पैकी ५ गुणही नाही देणार’

On: बुधवार, एप्रिल 28, 2021 4:41 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग हा नेहमीच आपल्या ट्विटमुळे आणि वक्तव्यामुळे चर्चेत असतो. मंगळवारी (२७ एप्रिल) झालेल्या दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यातील चुरशीच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाला १ धावाने पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्यानंतर वीरेंद्र सेहवागने रिषभ पंतच्या नेतृत्वावर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

वीरेंद्र सेहवागच्या मते, रिषभ पंत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात स्वत ला सिद्ध करण्यात अपयशी ठरला आहे. सेहवागने स्पष्टपणे म्हटले की,  “त्याने नेतृत्व करत असताना ज्या चुका केल्या आहेत, ते पाहून मी त्याला १० पैकी ५ गुणसुद्धा देऊ शकत नाही. जर तुम्ही तुमच्या संघातील प्रमुख गोलंदाजाचे ४ षटक पूर्ण करू शकत नाही. तर याचा अर्थ हाच आहे की, तुमचे गणित योग्य नाहीये. हीच तर कर्णधारासाठी मुख्य गोष्ट असते की, तुम्ही तुमच्या संघातील गोलंदाजांचा वापर कसा करतात. एका कर्णधाराला आपल्या संघातील गोलंदाजांचा योग् रित्या वापर करता आला पाहिजे. मी त्याला १० पैकी ३ गुण देतो.”

तसेच तो पुढे म्हणाला की, “जर रिषभ पंतला चांगला कर्णधार व्हायचं असेल; तर त्याला या छोट्या छोट्या गोष्टी समजून घ्याव्या लागतील. त्याला स्मार्ट क्रिकेट खेळावे लागेल तेव्हाच तो स्मार्ट कर्णधार बनू शकतो. सामना कोणत्या दिशेने स्वत:कडे वळवू शकतो यावर कर्णधाराची क्षमता अवलंबून असते. त्याला गोलंदाजानुसार क्षेत्ररक्षण लावायला शिकले पाहिजे.

रिषभ पंतने मार्कस स्टॉइनिसला शेवटचे षटक दिले होते. त्यावेळी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा विस्फोटक फलंदाज एबी डिविलियर्स तुफान फटकेबाजी करत होता. त्याने स्टॉइनिसच्या षटकात ३ षटकार मारत २३ धावा कुटल्या होत्या. परंतु त्याने मागच्या सामन्यात सामनावीर ठरलेल्या अमित मिश्राचे ४ षटक पूर्ण केले नव्हते. तसेच रबाडाचे षटक देखील आधीच संपवून टाकले होते. यामुळे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने १७१ धावांचा डोंगर उभारला.

महत्त्वाच्या बातम्या-

‘कोणालाही पूर्ण पृथ्वीतलावर फक्त डिविलियर्सची फलंदाजी पाहायला आवडेल, कारण तो..’ महान फलंदाजाने केली स्तुती

दिल्ली कॅपिटल्सचा ‘विभीषण’! सिराजला महत्त्वाचा मंत्र सांगितला अन् बेंगलोरने ‘रॉयल’ विजय मिळवला

CSKvSRH: धोनी पुन्हा गाठणार अव्वलस्थान की वॉर्नर मिटवणार लुजरचा टॅग; पाहा कोणाचे पारडे आहे जड?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---