सध्या भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत आहे. वर्ष 2018 मधील ‘सुई धागा’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यानचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडिओमध्ये बॉलिवूड अभिनेता वरुण धवन समवेत अनुष्का शर्मा माजी भारतीय क्रिकेटर हरभजन सिंग आणि झहीर खान आहेत.
अनुष्का आणि वरुण या क्रिकेटशी संबंधित कार्यक्रमामध्ये चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आले होते. यात अनुष्का शर्मा भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यातील आठवण सांगताना दिसत आहे. त्याचवेळी अनुष्काच्या बोलण्यावर झहीर खान तीची खिल्ली उडवताना दिसत आहेत.
खरे तर हा व्हिडिओ सप्टेंबर 2018 मध्ये आयोजित केलेल्या ‘युनिमोनी एशिया कप’ मधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यापूर्वीचा आहे. या व्हिडिओमध्ये कार्यक्रमाच्या होस्टने अनुष्का शर्माला भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यातील अविस्मरणीय आठवण सांगायला लावली.
होस्टच्या या प्रश्नावर अनुष्का म्हणाली, “माझ्यासाठी 2003 चा विश्वचषक हा अविस्मरणीय राहिला आहे. त्यावेळी मी क्रिकेट सामना एकदम व्यवस्थित आणि गांभीर्याने पाहण्यास सुरुवात केली होती.” पुढे अनुष्का काहीतरी बोलण्याअगोदर मध्येच झहीर खान “बर, मला वाटल आपण बर्याच काळापासून क्रिकेट पाहात आहात.” असे म्हटले. झहीरच्या या वक्तव्यावर वरुण धवन आणि प्रेक्षक हसताना दिसले.
पुढे झहीरच्या या मुद्द्यावर, अनुष्का म्हणाली, “मला नव्हते माहित की सामन्याची सुरुवात तुम्ही करणार आहात, मला वाटले की याची हे (विराट) सुरुवात करतील.” असे बोलल्यानंतरही सर्व लोक हसताना दिसले. या दरम्यान, हरभजन सिंग हातवारे करत झहीर खानला थांबवण्याचे संकेत देताना दिसतो.
https://www.instagram.com/p/CNMYEffgh5O/?utm_source=ig_web_button_share_sheet
वास्तविक, झहीर खान येथे विराट कोहलीचे नाव न घेता अनुष्का शर्माची थट्टा करताना दिसत आहे. त्यावेळी विराट आणि अनुष्काच्या लग्नाला जवळपास एक वर्ष पूर्ण होणार होते.
महत्त्वाच्या बातम्या-
असं सेलिब्रेशन आयुष्यात पाहिलं नसेल! विकेट घेताच गोलंदाजाने पायातले शूज काढले अन् कानाला लावले
सपशेल फ्लॉप ते सुपरहिट! सीएसकेला चोप चोप चोपणाऱ्या पृथ्वी शॉला कसा गवसला सूर? वाचा






