---Advertisement---

VIDEO। ‘आम्ही पहिल्यांदा भेटलो तेव्हा…’, भारताच्या माजी दिग्गजांनी शेअर केले धोनीसोबतच्या पहिल्या भेटीचे अनुभव

On: गुरूवार, जुलै 7, 2022 8:11 PM
MS-DHONI-CSK
---Advertisement---

भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस  धोनी (MS Dhoni) गुरुवारी (७ जुलै) त्याचा ४१ वा वाढदिवस साजरी करत आहे. धोनी संध्या त्याच्या कुटुंबासह इंग्लंडमध्ये सुट्ट्या घालवत आहे. त्याच ठिकाणी धोनीवा वाढदिवसही साजरा केला केला. भारताच्या या महान कर्णधारासोबतच्या अनेक आढवणी संघातील खेळाडूंकडे आहते. वाढदिवसानिमित्त भारताच्या काही माजी दिग्गजांनी धोनीसोबत त्यांच्या पहिल्या भेटीच्चा किस्सा सांगितला आहे.

स्टार स्पोर्ट्ससाठी भारतीय संघाचे माजी दिग्गज खेळाडू बोलत होते. व्हिडिओत माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाण (Irfan Pathan) म्हणत आहे की, मला लक्षात आहे मी २००४ मध्ये पहिल्यांदा धोनीशी भेटलो होतो. माझी सर्वात पहिली आठवण होती, ती बेंगलोरमध्ये. मी जबरदस्त फॉर्ममध्ये होते. कसोटी सामन्याचा सराव चालू होता. महेंद्रसिंग धोनी त्याव्हा फलंदाजी करण्यासाठी आला. मी विचार केला की, पहिलाच चेंडू बाउंसर टाकावा, पण त्याने जोरात पूल मारला. धाव एकच गेली होती, पण तेव्हा जाणवले की हा जो फलंदाज आहे, हा नक्कीच कोणीतरी खास आहे.

Happy Birthday MS Dhoni: The first memory of Captain Cool

माजी सलामीवीर आणि सध्या समालोचकाची भूमिका पार पाडणारा आकाश चोप्रा (Aakash Chopra) पुढे बोलतो. आकाश चोप्रा म्हणाला की, एमएस धोनीसोबतच्या माझ्या सर्वात  आधीच्या आढवणी आहेत भारत अ संघाच्या दौऱ्यातील. त्याच्या दोन-तीन महिन्यांपूर्वी देवधर ट्रॉफीचा एक सामना होता. हा खेळाडू आला आणि त्याने एकापाठोपाठ षटकार मारले. आम्ही सामना हरलो खेळपट्टी अवघड होती. परंतु एक खळाडू येतो आणि तुम्हाला षटकार ठोकून जातो, तेव्ह तुम्हाला जाणवते की, हा थोडा खास आहे. पण आपण त्यावेळी गांभीर्याने घेत नाही.

नंतर आम्ही पुन्हा भेटलो. हा दिलीप ट्रॉफीचा अंतिम सामना होता. हा सामना मोहालीमध्ये होता आणि आशीष नेहरा (Ashish Nehra) गोलंदाजीसाठी आला आणि हा खेळाडू सलामीसाठी आला होता. त्याने कवर्सच्या वरून एक षटकार मारला. शक्यतो दुसरे किंवा तिसरेच षटक होते. आम्ही म्हणाला अरे हा फलंदाज आहे तरी कोण, जो पाच दिवसांच्या सामन्यात पहिल्या दिवसी, पहिल्याच सत्रात, पहिल्याच तासात, आशीष नेहरा भारताचा वेगवान गोलेंदाज, त्याला कवर्सवरून षटकार मारतो.

माजी दिग्गज गोलंदाज आरपी सिंग (RP Singh) व्हिडिओच्या शेवटी बोलताना दिसत आहे. तो म्हाणाला की, आमचे दोन वेगवेगळे झोन होते. इस्ट झोन आणि सेंट्रल झोन, तेव्हा पहिल्यांदा धोनीसोबत भेट झाली होती. त्याची खेळण्याची पद्धत तेव्हा खूप आक्रामक होती. मोठेमोठे शॉट्स मारणे, षटकार तर चांगला मारायचाच, पण लांब षटकार मारणे ही खासीयत होती. एकदा भारत अ च्या एका कार्यक्रमात आम्ही भेटलो होतो, ज्यामध्ये मी खेळलो नव्हतो, हीच माझी भारतीय संघात येण्यापूर्वीची धोनीसोबतची सर्वात अलिकडची आढवण आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या –

उद्योजक आनंद महिंद्रांकडून धोनीला वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा, म्हणाले…

जॉसची इंग्लंड पडणार रोहितच्या टीम इंडियवर भारी!, भारताच्या माजी दिग्गजानेच केलाय दावा

रणजी ट्रॉफी गाजवणारा ‘तो’ खेळाडू टीम इंडियामध्ये यायलाच हवा, भारतीय दिग्गजाने केली मागणी

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---