भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात खेळल्या जात असलेल्या 5 सामन्यांच्या बाॅर्डर-गावसकर मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्यात युवा खेळाडू ‘नितीश कुमार रेड्डी’ने (Nitish Kumar Reddy) शानदार शतक झळकावले. या बाॅक्सिंग डे कसोटीत त्याने 140 कोटी भारतीयांंची मान उंचावेल अशी कामगिरी केली आहे. 21 वर्षीय खेळाडूने या ऐतिहासिक मेलबर्न मैदानावर आपले पहिले आंतरराष्ट्रीय कसोटी शतक झळकावले आहे. त्यावर आता माजी भारतीय दिग्गज खेळाडू सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
नितीश कुमार रेड्डीने 171 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. दरम्यान त्याने 10 चौकारांसह 1 उत्तुंग षटकार देखील लगावला. पहिल्यांदा त्याने 81 चेंडूत 50 धावा पूर्ण केल्या होत्या. त्याच्या या धमाकेदार खेळीमुळे त्याच्या नावावर अनेक रेकाॅर्ड देखील झाले आहेत.
माजी भारतीय दिग्गज खेळाडू सुनील गावसकर (Sunil Gavaskar) म्हणाले की, “नितीश कुमार रेड्डीचे हे शतक भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम शतकांपैकी एक मानले पाहिजे.”
आपल्या पहिल्याच ऑस्ट्रेलिया दाैऱ्यात नितीशने अप्रतिम रेकाॅर्ड केला आहे. ऑस्ट्रेलियात पहिले कसोटी शतक झळकावणारा तो तिसरा सर्वात तरूण भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याने 76 वर्षे जुना रेकाॅर्ड मोडला. नितीशने वयाच्या 21 वर्षे 216 दिवसात ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर शतक झळकावण्याचा भीमपराक्रम केला.
ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात फलंदाजी करताना 474 धावा धावफलकावर लावल्या होत्या. प्रत्युत्तरात, भारताच्या पहिल्या डावात 114.3 षटकात 9 बाद 354 धावा झाल्या आहेत. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर भारतीय संघ 116 धावांनी पिछाडीवर आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs AUS; सामना एक विक्रम अनेक, 21 वर्षीय नितीशकुमारने मेलबर्न गाजवले..!
IND vs AUS; रोहित शर्माबद्दल माजी खेळाडूचे मोठे वक्तव्य! म्हणाला, “तो व्हीआयपी…”
नितीश रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदरच्या नजरा सचिन-भज्जीच्या रेकॉर्डवर, 16 वर्ष जुना रेकॉर्ड मोडणार का?