---Advertisement---

भारतीय संघाची फलंदाजी फ्लाॅप ठरल्यानंतर, भडकला माजी खेळाडू! म्हणाला, “फलंदाजी प्रशिक्षक…”

On: सोमवार, डिसेंबर 16, 2024 8:41 PM
---Advertisement---

भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनी भारतीय संघाच्या फलंदाजी प्रशिक्षकाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय फलंदाजांचे अपयश पुन्हा एकदा समोर आले आहे. ब्रिस्बेनमध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघाने 48 धावात 4 विकेट्स गमावल्या आहेत. सलामीवीर ‘यशस्वी जयस्वाल’शिवाय (Yashasvi Jaiswal) शुबमन गिल (Shubman Gill), विराट कोहली (Virat Kohli), रिषभ पंत (Rishabh Pant) लवकर बाद झाले.

भारतीय फलंदाजांच्या या अपयशानंतर संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनी ‘बीसीसीआय’कडून (BCCI) भारतीय प्रशिक्षक कर्मचाऱ्यांमध्ये फलंदाजी प्रशिक्षकाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. हा माजी भारतीय फलंदाज म्हणाला की, भारताच्या फलंदाजीत अनेक तांत्रिक समस्या आहेत, ज्या बऱ्याच काळापासून दिसत आहेत आणि अशा परिस्थितीत संघ व्यवस्थापनाला जबाबदार धरले पाहिजे.

संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनी एक्स वर लिहिले की, “मला वाटते की भारतीय संघातील फलंदाजी प्रशिक्षकाच्या भूमिकेची चौकशी करण्याची वेळ आली आहे. अखेर, अशा मोठ्या तांत्रिक समस्या अजूनही भारतीय फलंदाजांसमोर आहेत. @BCCI.”

महत्त्वाच्या बातम्या-

IND vs AUS; मोहम्मद सिराजची ढाल बनला जसप्रीत बुमराह! म्हणाला…
‘पृथ्वी शाॅ’बद्दल स्टार खेळाडूचे मोठे वक्तव्य! म्हणाला, “कोणीही त्याला बेबीसिट…”
IND vs AUS; तुमचा आवडता शाॅट विसरा, माजी खेळाडूचा विराटला सल्ला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---