भारतीय महिला संघाची दिग्गज यष्टीरक्षक यष्टीरक्षक फलंदाज करुणा जैन हिने क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्तीची घोषणा केली. रविवारी म्हणजेच २४ जुलै रोजी तिने ही मोठी घोषणा केली आहे. बेंगलोरमध्ये जन्मलेल्या करुणाने वयाच्या ३६ व्या वर्षी हा निर्णय घेतला आहे.
करुणा जैन (Karuna Jain) हिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्ती घेताना सांगितले की, “हा खूप आनंदी आणि संतुष्ट अनुभव आहे. तसेच क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्ती घेण्याची घोषणा करताना आणि खेळासाठी पुन्हा काहीतरी योगदान देण्यासाठी उत्सुक आहे.”
“मी या प्रसंगी त्या सर्वांना धन्यवाद म्हणू इच्छिते, जे सुरुवातीपासून माझ्या क्रिकेटच्या प्रावासात सहभागी राहिले आहेत. यामध्ये माझे प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ आणि संघातील माझे सहकाही सहभागी आहेत. यातील प्रत्येकाने मला खेळ आणि जीवनाविषयी काहीतरी वेगळे शिकवले आहे. त्यामुळेच मी ती खेळाडू आणि व्यक्ती बनू शकले, जी मी आज आहे,” असेही करुणा पुढे बोलताना म्हणाली.
करुणाच्या कारकिर्दीचा विचार केला, तर तिने २०१४ नंतर एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नसल्याचे दिसते. तिने कसोटी क्रिकेटमध्ये खेळलेल्या पाच सामन्यांमध्ये १९५ धावा केल्या. यादरम्यान तिची सर्वात मोठी खेली ४० धावांची राहिली आहे. नोव्हेंबर २००५ साली तिने इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते, तर शेवटचा कसोटी सामना तिने ऑगस्ट २०१४ साली इंग्लंडविरुद्ध बार्म्सलेमध्ये खेळला होता.
करुणाने कारकिर्दीत एकूण ४४ एकदिवसीय सामने खेळले आणि यामध्ये ९८७ धावा केल्या. यादरम्यान तिच्या बॅटमधून एक शतकही निघाले. एकदिवसीय क्रिकेटमधील तिची सर्वात मोठी खेळी १०३ धावांची राहिली आहे. २००४ साली वेस्ट इंडीजविरुद्धच्या सामन्यातून तिने एकदिवसीय पदार्पण केले होते, तर शेवटचा एकदिवसीय सामना तिने २०१४ मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळला होता. पदार्पणाच्या सामन्यात करुणाने ६४ धावांची ताबडतोड खेळी केली होती.
टी-२० क्रिकेटमध्ये करुणा एकूण ९ सामन्यांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करू शकली. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातून टी-२० क्रिकेमध्ये पदार्पण करणाऱ्या करुणाने या प्रकारातील शेवटचा सामना २०१४ सालीच खेळला होता. कसोटी क्रिकेटमध्ये तिने यष्टीपाठी एकूण १७ खेळाडूंना बाद केले आहे. एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटमध्ये तिने अनुक्रमे ५८ आणि १२ खेळाडूंना यष्टीपाठी बाद केले आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘हाऊ इज द जोश!’ मालिका विजयानंतर टीम इंडियाचे जोरदार सेलिब्रेशन, पाहा व्हिडिओ
अक्षरने षटकार लगावत सामनाच नाही तर धोनीचा रेकॉर्डही केलायं फिनीश, रचले ‘हे’ दोन नवीन विक्रम
‘सामन्यानंतर बोलताना अय्यरची जीभ घसरली अन् पुढे….’, व्हिडिओ व्हायरल






