काही दिवसांपूर्वीच न्यूझीलंडचा माजी अष्टपैलू खेळाडू कोरी अँडरसनल बंधनात अडकला आहे. अँडरसनने मैत्रीण मेरी मार्गेटसोबत लग्न केले आहे. अँडरसनने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर करून त्याने लग्नाची माहिती दिली आहे. त्याचबरोबर दोन्ही कुटुंबातील लोक आणि मित्रमंडळी या फोटोमध्ये दिसून येत आहेत.
कोरी अँडरसनने लग्नाचे फोटो केले पोस्ट
कोरी अँडरसनने इंस्टाग्रामवर पत्नी मेरीसोबत डान्स करतानाचा एक व्हिडिओ ही शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सर्व पाहुणे अँडरसन आणि मेरीच्या डान्सवर टाळ्या वाजवत आहेत. कोरी अँडरसनने ज्या चर्चमध्ये लग्न केले ते चर्च फुलांनी सजवले होते. याच दरम्यान, हे जोडपे उर्वरित पाहुण्यांसोबत जेवतानाही दिसले.

कोरी अँडरसनची कारकीर्द
क्रिकेटपटू कोरी अँडरसनच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान शतक झळकावणारा दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आहे. त्याने वेस्टइंडिजविरुद्ध २०१४ साली ३६ चेंडूत शतक झळकावले होते. कोरी अँडरसनने न्यूझीलंडसाठी १३ कसोटी सामन्यांमध्ये ३२.५२ च्या सरासरीने ६८३ धावा केल्या आहेत. त्याने ४९ एकदिवसीय सामन्यांमध्ये ११०९ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर, टी२० मधील ३१ सामन्यांमध्ये त्याने ४८५ धावा केलेल्या आहे.

न्यूझीलंड संघाकडून खेळत असलेला कोरी अँडरसन हा आता अमेरिकेत क्रिकेट खेळताना दिसणार असल्याची माहिती समोर आली आहे. कोरी अँडरसनने अमेरिकेच्या मेजर टी २० लीगमध्ये खेळण्यासाठी तीन वर्षांचा करार केला आहे. कोरी अँडरसनची पत्नी मेरी मार्गारेट ही अमेरिकेची असल्यामुळे यामागे हे ही एक मुख्य कारण आहे. त्याने गेल्यावर्षी न्यूझीलंड क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
ऑलिम्पिक पदक थोडक्यात हुकलेल्या खेळाडूंचे विराट कोहलीने वाढवले मनोधैर्य; म्हणाला…
ऑलिम्पिक स्पर्धेत ‘या’ द्रोणाचार्यांनी केलेल्या मेहनतीला आले अखेर यश; जाणून घ्या संपूर्ण माहिती






