गतवर्षी यूएई मध्ये झालेल्या आयपीएल २०२० स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्ज संघाला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते. चेन्नई सुपर किंग्ज संघाला ७ व्या क्रमांकांवर समाधान मानावे लागले होते. परंतु चेन्नई सुपर किंग्ज संघाने आयपीएल २०२१ जोरदार पुनरागमन केल्याचे पाहायला मिळाले आहे. तसेच चेन्नई संघातील खेळाडू जोरदार फॉर्म मध्ये असल्याचे दिसून आले होते. यंदा चेन्नईचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. परंतु कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आयपीएल २०२१ स्पर्धा तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चेन्नई सुपर किंग्ज संघाची जोरदार कामगिरी पाहून न्यूझीलंड संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू आणि आता समालोचकाची भूमिका पार पाडणारा स्कॉट स्टायरिस याला आश्चर्याचा धक्का बसला आहे.
चेन्नई सुपर किंग्ज संघाची जोरदार कामगिरी पाहून स्कॉट स्टायरिस म्हणाला,” चेन्नई सुपर किंग्ज संघाने गतवर्षी केलेल्या निराशाजनक कामगिरी नंतर या हंगामात जोरदार पुनरागमन केले आहे. यावरून हे स्पष्ट होते की,तो एक वाईट काळ होता. खरं सांगू तर मला या हंगामात चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून अशा कामगिरीची अपेक्षा नव्हती. परंतु हा एक समजूतदार संघ आहे. त्यांनी काही स्मार्ट निर्णय घेतले होते.”
“मोईन अलीला बढती देण्याचा निर्णय ठरला अचूक”
चेन्नई सुपर किंग्ज संघातील फलंदाजांनी संघाला निराश केले नाही. त्यांनी जेव्हा जेव्हा संघाला गरज होते. त्यावेळी येऊन संघासाठी धावा केल्या होत्या. तसेच तो पुढे म्हणाला की,”चेन्नई सुपर किंग्ज संघाने या हंगामात सुरेश रैना आणि अंबाती रायडू यांना खालच्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवून मोइन अलीला वरच्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी पाठवले होते. रैनाने तिसऱ्या क्रमांकावर चांगली फलंदाजी केली आहे. परंतु तो आता सतत क्रिकेट खेळत नाही म्हणून हा निर्णय घेतला गेला असावा. ”
तसेच तो पुढे म्हणाला की, “मोईन अलीला संघात स्थान देणे हा, चेन्नई सुपर किंग्ज संघाचा मोठा निर्णय होता. गतवर्षी चेन्नई सुपर किंग्ज संघातील मध्यक्रमातील फलंदाज धावा करण्यात अपयशी ठरले होते. माझ्या मते हेच मुख्य कारण होते की,चेन्नई सुपर किंग्ज संघ २०२० मध्ये आयपीएलच्या प्लेऑफ मध्ये पोहोचण्यास अपयशी ठरला होता. त्यामुळे चेन्नईने आपल्या कमकुवत बाजूवर काम करत, त्याला मजबूत करून टाकले. हेच मुख्य कारण आहे की, संघाने खूप चांगली कामगिरी केली.”
महत्त्वाच्या बातम्या –
अंबानींच्या संघाची तऱ्हाच निराळी! परदेशी खेळाडूंना घरी पोहचवण्यासाठी केली खाजगी विमानाची व्यवस्था





