भारताचा माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीरने म्हटले आहे की की जोपर्यंत भारतीय खेळाडू दबाव सांभाळू शकत नाहीत तोपर्यंत ते स्वत:ला जगज्जेते म्हणून शकत नाही. त्यांना मोठ्या स्पर्धेत स्वत:ला सिद्ध करावे लागेल.
मागील काही वर्षात भारतीय संघ सातत्याने मोठ्या स्पर्धांमध्ये उपांत्य आणि अंतिम फेरीपर्यंत धडक मारुनही विजेतेपद मिळवण्यात अपयशी ठरत आहे. भारताने याआधी 2013 ची चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर मोठी आयसीसी स्पर्धा जिंकलेली नाही.
याबद्दल स्टार स्पोर्ट्सवरील क्रिकेट कनेक्टेड कार्यक्रमात बोलताना गंभीर म्हणाला, ‘एक चांगला खेळाडू आणि खूप चांगला खेळाडू यामधील फरक म्हणजे आपण कठिण प्रसंगात काय करता यावरुन ठरतो. मला असे वाटते की कदाचित आपण दबाव हाताळू शकलो नाही, कदाचित इतर संघ दबाव त्या प्रकारे हाताळू शकले असतील’
‘जर तुम्ही सर्व उपांत्य आणि अंतिम फेरीकडे पाहिले तर लक्षात येईल जर साखळी फेरीत खरोखरच चांगले खेळलो असेल पण उपांत्य फेरीमध्ये किंवा बाद फेरीत चांगले खेळत नसेल, कदाचित हे तुमच्या मानसिक कणखरपणा बद्दल देखील असेल.’
2011 च्या वनडे विश्वचषक आणि 2007 च्या टी20 विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा गंभीर महत्त्वाचा भाग होता.
तो पुढे म्हणाला, ‘आपण असे बोलू शकतो की आमच्याकडे सर्व काही आहे, आमच्याकडे विश्वविजेते होण्याची क्षमता आहे, परंतु जोपर्यंत आपण क्रिकेटच्या मैदानावर जात नाही आणि हे सिद्ध करत नाही तोपर्यंत आपण कधीही विश्वविजेते म्हणून ओळखले जाणार नाही.’
‘अशा कठिण परिस्थितीमध्ये ती फक्त आपली क्षमता आहे. द्विपक्षीय आणि लीग टप्प्यात आपल्याला कदाचित चूक करण्याची संधी मिळते, पण बाद फेरी गाठल्यानंतर, आपल्याकडे चूक करण्याची संधी नसते. जर चूक केली तर तूम्हाला पुन्हा घरी परतावे लागते. त्यामुळे इथे खेळताना विश्वास पाहिजे आणि तिथेच भारतीय संघ महत्त्वाच्या सामन्यात कमी पडतो.’
ट्रेंडिंग घडामोडी –
विक्रमात सचिनच्या पुढे होता हा खेळाडू, परंतु चर्चा व्हायची ड्रग्ज घेण्याची
न्यूझीलंडमध्ये होणारा 2021 सालचा विश्वचषक जिंकून मी निवृत्त होईन
क्रिकेट जगतातून सुशांत सिंग राजपूतला श्रद्धांजली; विराट,सचिनसह या क्रिकेटपटूंचे भावनिक ट्विट