फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन बलाढ्य संघांमध्ये बॉर्डर गावसकर ट्रॉफी 2023 चे आयोजन केले गेले आहे. चार सामन्यांच्या या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघ भारतात दाखल झाला आहे. उभय संघांतील ही कसोटी मालिका पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. दोन्ही संघांनी मालिकेपूर्वी सरावाला सुरुवात केली आहे. मालिका सुरू होण्याआदी पाकिस्तानचा माजी कर्णधार राशिद लतीफ याने ऑस्ट्रेलियन संघाला सावध केले आहे.
राशिद लतीफ (Rashid Latif) याच्या मते कसोटी मालिकेत प्लेइंग इलेव्हनमध्ये दुसरा फिरकी गोलंदाज ऑस्ट्रेलिया संघासाठी कमजोर कडी ठरू शकतो. ऑस्ट्रेलियन संघाने या कसोटी मालिकेसाठी त्यांच्या संघात चार फिरकी गोलंदाजांना सामील केले आहे. नाथन एलिस याचे प्लेइंग इलेव्हनमधील स्थान पक्के मानले जात आहे. एलिस ऑस्ट्रेलियाच्या कोसटी संघाचा नियमित खेळाडू आहे. एस्टन एगर, मिचेल स्वॅप्सन आणि टॉम मर्फी यांच्यातून संघात इतर फिरकी गोलंदाजाची निवड केली जाईल. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना 9 फेब्रुवारीपासून नागपूरमध्ये खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघ किमान दोन फिरकी गोलंदाजांसह मैदानात उतरेल. फिरकी गोलंदाजी या आगमी मालिकेत महत्वाचू भूमिका पार पाडू शकतात.
नाथन एलिसला भारताविरुद्ध चांगली गोलंदाजी करावी लागणार – राशिद लतीफ
आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना राशिद लतीफ म्हणाला की, “ऑस्ट्रेलियासाठी संघातील दुसरा फिरकी गोलंदाज कमजोर कडी ठरू शकतो. मिचेल स्वॅप्सन आणि एस्टन एगरपैकी कोणीही असुद्या तो संघात अडचण बनू शकतो. स्वॅप्सन कराचीमध्ये पाकिस्तान संघाविरुद्धही खेळला होता आणि हा सामना अनिर्णित राहिला. नाथन लियोनला या मालिकेत पुन्हा एकदा चांगले गोलंदाजी करावी लागले.”
दरम्यान भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना 9 ते 13 फेब्रुवारीला खेळला जाईल. मालिकेतील दुसरा कसोटी सामना 17 ते 21 फेब्रुवारीदरम्यान दिल्लीमध्ये खेळला जाईल. तिसरा कसोटी सामना 1 ते 5 मार्चदरम्यान धर्मशालामध्ये खेळला जाईल. चौथा आणि शेवटचा कसोटी सामना 9 ते 13 मार्च दरम्यान अहमदाबादमध्ये खेळला जाईल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘या’ तारखेपासून सुरू होतेय महिला प्रीमिअर लीग, पहिल्या सामन्यात अंबानी- अदांनींचे संघ भिडणार एकमेकांशी
पाकिस्तानी क्रिकेटरला झालंय तरी काय? विराटनंतर ‘या’ भारतीयाविषयी गरळ ओकत म्हणाला, ‘आमच्याकडे चिक्कार…’






