पाकिस्तानचा माजी कर्णधार सरफराज अहमदचा एक व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. व्हिडिओत सरफराज एका लहान मुलाने टाकेलल्या चेंडूवर त्रिफळाचीत होतो. हा लहान मुलगा दुसरा कोणी नसून त्याचा स्वतःचा मुलगा आहे. अवघ्या ५ वर्षाच्या या मुलाने त्याच्या वडिलांना त्रिफळाचीत केल्यामुळे अनेकांना आश्चर्य वाटत आहे, तर काहीजण सरफराजला ट्रोल करू लागले आहेत.
सरफराज अहमद (Sarfaraz Ahmed) आणि त्याच्या पाच वर्षीय मुलाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्रिफळाचीत झालेल्या सरफराजची अनेकजण खिल्ली उडवताना दिसत आहेत. सरफराजच्या नेतृत्वात पाकिस्तान संघाने २०१७ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी अंतिम सामन्यात भारताला पराभूत करून विजेतेपद जिंकले होते.
सरफराज पाकिस्तान संघाचा कर्णधार असताना संघाने अनेक महत्वाच्या मालिका आणि विजेतेपद जिंकले आहेत. परंतु श्रीलंकेविरुद्धच्या मायदेशात खेळल्या गेलेल्या टी-२० मालिकेत पाकिस्तान संघाला लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला होता. या पराभवानंतर सरफराजने कर्णधारपद सोडले. सध्या बाबर आझम कसोटी, टी-२० आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये पाकिस्तान संघाचे नेतृत्व करत आहे.
माजी कर्णधाराचा जो व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे, त्यामध्ये तो एका सार्वजनिक ठिकाणी आहे. त्याच्या अवतीभवती सर्वत्र युवक आणि प्रौढ लोकांची गर्दी दिसत आहे. त्याच्या हातात बॅट आहे आणि मागे स्टंप्स समजून मोकळे क्रेट उभे केले आहे. त्याचा मुलगा गोलंदाजी करत आहे. सरफराज बॅट फिरवणारच होता, तोवर त्याच्या मुलाने टाकलेला चेंडू स्टंपवर जाऊन लागला. तो त्रिफळाचीत झाल्यानंतर त्या ठिकाणीचा जमाव त्याच्या मुलाच्या समर्थनार्थ जल्लोष करू लागतो.
दरम्यान, सरफराजने पाकिस्तानसाठी त्याचा शेवटचा टी-२० सामना २०२१ मध्ये खेळला होता. तो नोव्हेंबरमध्ये बांगलादेशविरुद्धच्या टी-२० मालिकेत पाकिस्तान संघाचे प्रतिनिधित्व करत होता. त्याने शेवटचा एकदिवसीय सामना याचवर्षी एप्रिलमध्ये खेळला होता, जो दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सेंचुरियनमध्ये पार पडला होता.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
स्टार फुटबॉलर रोनाल्डोच्या गाडीचा भीषण अपघात, १६ कोटींची गाडी चक्काचूर; सुदैवाने…
दीपक चाहरने दिली स्वतःच्या फिटनेसविषयी मोठी अपडेट, वाचा कधी करणार पुनरागमन?
नया है यह! लाईव्ह सामन्यात अंपायरिंग सोडून पंच करू लागले क्षेत्ररक्षण, झेल घेतानाचा फोटो व्हायरल