---Advertisement---

कंगाल पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने ओकली भारताबद्दल गरळ; जे काय म्हणाला, त्याने तळपायाची आग जाईल मस्तकात

Javed-Miandad-And-Virat-Kohli
---Advertisement---

भारत आणि पाकिस्तान हे एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी आहेत. मैदानात असो किंवा मैदानाबाहेर दोन्ही देशात कायम तणावाची स्थिती पाहायला मिळते. पाकिस्तानी खेळाडू अनेकदा भारताविरुद्ध असे काही वादग्रस्त वक्तव्य करतात की, ज्यामुळे खळबळ माजल्याशिवाय राहत नाही. अशात आर्थिक मंदीमुळे कंगाल होण्याच्या मार्गावर असलेल्या पाकिस्तानमधून पुन्हा एक खळबळजनक प्रतिक्रिया आली आहे. एका माजी पाकिस्तानी खेळाडूने भारताविरुद्ध गरळ ओकली आहे, ज्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे. तो खेळाडू इतर कुणी नसून माजी क्रिकेटपटू जावेद मियाँदाद आहे.

आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) हा कुठे होणार याविषयी बीसीसीआय आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डामध्ये मागील काही काळापासून बाचाबाची सुरू आहे. पाकिस्तानला यावेळी आशिया चषकाचे यजमानपद मिळाले आहे. मात्र, भारताने तिथे जाऊन खेळण्यास नकार दिला आहे. तसेच, बीसीसीआयचे सचिव जय शाह (Jay Shah) यांनीही स्पर्धा इतर तटस्थ ठिकाणी खेळवण्याबाबत भाष्य केले आहे. यावर आता माजी पाकिस्तानी कर्णधार जावेद मियाँदाद (Javed Miandad) याने या मुद्द्यावर वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

मियाँदादने भारताच्या पाकिस्तानात येऊन आशिया चषक न खेळण्याच्या प्रश्नावर मोठे भाष्य केले. तो म्हणाला की, “मी तर आधीही म्हणत होतो की, जर भारत आमच्या इथे खेळायला आला नाही, तरी आम्हाला काही फरक पडत नाही. मी नेहमीच पाकिस्तानचे समर्थन केले आहे. तसेच, तुम्हाला माहितीये की, जेव्हाही भारत-पाकिस्तान विषय असतो, तेव्हा मी भारताला कधीच सोडत नाही. मात्र, आपल्याला आपल्या जबाबदारीवर लक्ष दिले पाहिजे. तसेच, त्यासाठी होईल तितके लढले पाहिजे.”

मियाँदादने भारताविरुद्ध ओकली गरळ
पाकिस्तानी क्रीडा पत्रकार फरीद खान याने मियाँदादच्या हवाल्याने ट्वीट केले. त्याने ट्वीटमध्ये लिहिले की, “भारत आमच्या देशात खेळायला आला, तर ठीक नाहीतर काही फरक पडत नाही. आम्ही तर स्पर्धेचे यजमानपद साकारणार. हे आयसीसीचे काम आहे, त्यांनी पाहावे. जर आयसीसी यावर नियंत्रण ठेवू शकत नाही, तर या संस्थेला काही अर्थ नाही. आयसीसीला प्रत्येक संघ आणि बोर्डासोबत एकच नियम ठेवले पाहिजेत. जर कुणीही इतरांच्या देशात खेळायला नकार दिला, तर त्या संघाला बाहेर काढले पाहिजे. भारतीय संघ त्यांच्यासाठी आहे, आमच्यासाठी नाही.”

मियाँदाद एवढ्यावरच थांबला नाही, त्याने पुढे म्हटले की, “भारत पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास का घाबरतो? त्यांना माहितीये की, जर ते पाकिस्तानकडून हारले, तर त्यांची जनता त्यांना सोडणार नाही. नरेंद्र मोदीही गायब होतील. त्यांची जनता त्यांना सोडणार नाही.”

विशेष म्हणजे, पाकिस्तान बोर्डाचे अध्यक्ष नजम सेठी यांनी बैठकीत स्पष्ट केले आहे की, जर भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तानमध्ये आला नाही, तर त्यांचा संघही यावर्षी वनडे विश्वचषकासाठी भारतात जाणार नाही. (former pakistan cricketer javed miandad on bcci vs pcb asia cup 2023 hosting india)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
झुलन गोस्वामीकडे आली मुंबई इंडियन्स संघाची महत्वाची जबाबदारी, चार्लोट एडवर्ड्स बनली मुख्य प्रशिक्षक
पीसीबीचे अध्यक्ष नजम सेठी यांचे वादग्रस्त विधान, सोशल मीडियावर चाहत्यांच्या गंंमतीशीर प्रतिक्रिया

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---