सध्या भारत आणि इंग्लंड संघात नॉटिंगहॅम येथे पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. याच कसोटी सामन्यातील भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतच्या खेळीवर पाकिस्तानचे माजी कर्णधार सलमान बट यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. पंतने एक छोटी खेळी खेळली असेल. पण त्याच्या आक्रमक फलंदाजीने भारतीय संघाला खूप मदत झाली असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. याबरोबरच त्यांनी पंतला त्याचा नैसर्गिक खेळ असाच पुढे सुरू ठेवावा असा सल्लाही दिला आहे.
रिषभ पंतने पहिल्या कसोटी सामन्यातील भारताच्या पहिल्या डावात २० चेंडूमध्ये २५ धावा केल्या होत्या. बाद होण्याआधी त्याने रॉबिन्सनविरुद्ध १ चौकार आणि १ षटकार मारले होते. त्यानंतर पंत हा रॉबिन्सनच्या षटकातील शेवटच्या चेंडूवर तंबूत परतला होता. पंत अशाप्रकारे बाद झाल्यानंतर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काहींनी त्याची फलंदाजीची शैली बरोबर म्हटली; तर काहींनी त्याच्या आक्रमक शैलीला चुकीचे म्हटले आहे.
आपल्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना सलमान बट म्हणाले की, पंतची ही कॅमिओ खेळी भारतीय संघाच्या दृष्टीने खूप महत्त्वाची होती. ते म्हणाले की, “रिषभ पंतच्या २५ धावा खूप महत्वाच्या होत्या. तो त्याच्या पद्धतीने क्रिकेट खेळतो. जर तो त्याच्या लयीमध्ये आला तर तो उत्कृष्ट खेळी करतो. त्याचबरोबर लोक त्याचे खूप कौतुक करत असतात. जर तुम्ही दबावाखाली मुक्तपणे खेळत असाल तर चेंडू बॅटवर बरोबर येतो. परंतु जर तुम्ही कुठेतरी बाहेर पडलात तर लोकदेखील प्रश्न उपस्थित करत असतात. मला वाटते की पंतने चांगले काम केले. हा त्याचा खेळण्याचा मार्ग आहे आणि अशाप्रकारे तो आपला प्रभाव सोडतो.”
यापूर्वी माजी अनुभवी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणने देखील रिषभ पंतबद्दल मोठी प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले होते की, “पंतला संघ व्यवस्थापनाकडून आपला नैसर्गिक खेळ खेळण्याचा परवाना मिळाला आहे. कारण जेव्हा तो त्याचा नैसर्गिक खेळ खेळतो तेव्हा तो विरोधी संघासाठी खूप धोकादायक ठरत असतो. पंतने सिडनी आणि ब्रिस्बेनमध्ये अतिशय हुशारीने फलंदाजी केली होती आणि इथेही तेच करण्याची अपेक्षा आहे.”
या कसोटीमधील भारताचा पहिला डाव २७८ संपला आहे. तर पुढील डावात तो कशा पद्धतीने कामगिरी करेल हे पाहण्यासारखे आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs ENG: रोहितचा कसोटी संघातून कटणार पत्ता? ‘हा’ युवा खेळाडू राहुलसह करणार ओपनिंग
क्रिकेट जगतातील सर्वात सभ्य गृहस्थाची गोष्ट, नाव आहे ‘केन विल्यमसन’
फलंदाजांच्या कानाजवळून शिट्टीचा आवाज काढत जाणारे चेंडू टाकण्यासाठी कुप्रसिद्ध ठरलेला गोलंदाज