आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीवरून (ICC Champions Trophy) भारत आणि पाकिस्तानमध्ये (India vs Pakistan) तणाव कायम आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी हायब्रीड मॉडेलवर खेळवण्याची भारतीय नियामक मंडळाची (BCCI) मागणी आहे. सुरक्षेच्या कारणास्तव भारताने आपला संघ पाकिस्तानात पाठवण्यास नकार दिला आहे. यावर आता पाकिस्तानचा माजी क्रिकेटर बासित अलीचे (Basit Ali) मोठे वक्तव्य केले आहे.
बासित अलीने (Basit Ali) आपल्या यूट्यूब चॅनलवर म्हटले की, “जर क्रिकेट चालू ठेवायचे असेल आणि हायब्रीड मॉडेल कायम ठेवायचे असेल तर पाकिस्तानला एका गटात आणि भारताला दुसऱ्या गटात ठेवा, परंतु आयसीसी किंवा प्रसारक या दोघांनाही आनंद होणार नाही, कारण ते पैसे कमवण्याचा एक मार्ग नाही.”
पुढे बोलताना बासित अली म्हणाला की, “जग काय मुर्ख आहे. तुम्ही भारत आणि पाकिस्तानला एका गटात ठेवता.” ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडला एकाच गटात ठेवण्यात येते. मात्र बासित अलीचे मत वेगळे आहे. भारत-पाकिस्तान सामना क्रिकेटसाठी महत्त्वाचा असल्याचे बासित अलीचे मत आहे.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी (ICC Champions Trophy) हायब्रीड मॉडेलवर आयोजित करण्याची बीसीसीआय (BCCI) सातत्याने मागणी करत आहे. या मॉडेल अंतर्गत, भारतीय संघ आपले सामने तटस्थ ठिकाणी खेळेल, परंतु इतर सर्व सामने पाकिस्तानमध्ये खेळले जातील. त्याचवेळी, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) बीसीसीआय आणि भारताच्या मागण्या सतत फेटाळत आहे.
आगामी आयसीसी चॅन्पियन्स ट्राॅफी फेब्रुवारी-मार्च दरम्यान मध्ये खेळली जाण्याची शक्यता आहे. पण भारतीय नियामक मंडळाने (BCCI) भारतीय संघ चॅम्पियन्स ट्राॅफीसाठी पाकिस्तानमध्ये जाणार नाही. असे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (ICC) सांगितले आहे. त्यामुळे यावर आता अनेक माजी खेळाडू आपली प्रतिक्रिया देत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
आयसीसीचा पाकिस्तानला मोठा झटका! चॅम्पियन्स ट्रॉफीचा पीओकेतील दौरा रद्द
“पाकिस्तानात खूप दहशतवाद….”, बीसीसीआयनं आयसीसीला स्पष्टच सांगितलं!
विराट कोहलीला दुखापत झाली का? कसोटी मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियन मीडियातर्फे माइंड गेम सुरू