---Advertisement---

प्रसिद्ध-कृणालने उधळले इंग्लंडचे मनसुबे; पाकिस्तानी दिग्गज म्हणाले, ‘भारतात क्रिकेटर जन्माला घालणारी मशीन’ 

---Advertisement---

कसोटी, टी२० मालिकेचा टप्पा पूर्ण केल्यानंतर भारत विरुद्ध इंग्लंड संघात वनडे मालिका खेळली जात आहे. पुण्याच्या गहुंजे स्टेडियमवर २३ मार्च रोजी या मालिकेतील पहिला वनडे सामना झाला. या सामन्यात यजमानांनी पाहुण्यांचा धुव्वा उडवत ६६ धावांनी विजयी पताका झळकावली. यासह भारत १-० ने वनडे मालिकेत आघाडीवर आहे.

भारताच्या या सामना विजयात पदार्पणवीर प्रसिद्ध कृष्णा आणि कृणाल पंड्या यांचा मोलाचा वाटा राहिला. त्यांच्या कामगिरीचे वारे केवळ भारतातच नव्हे पाकिस्तानातही पसरले आहे. माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू इंजमाम-उल-हक यांनी या पदार्पणवीरांची तोंडभरून प्रशंसा केली आहे.

इंजमाम हे भारतीय संघाच्या तिन्ही स्वरुपातील प्रदर्शनाने अत्यंत प्रभावित झाले आहेत. भारतीय खेळाडूंची मागील काही काळातील कामगिरी पाहता; भारताकडे कसली तरी मशीन असावी जी प्रतिभाशाली खेळाडूंना जन्माला घालते, असे त्यांचे म्हणणे आहे.

आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना इंजमाम म्हणाले की, “मला वाटते की भारताकडे कोणती तरी मशीन आहे, जी नवोदित क्रिकेटपटूंना तयार करते. यावेळी पुन्हा २ नव्या क्रिकेटपटूंनी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले आहे. खरे तर, याद्वारे प्रत्येक क्रिकेटपटूला संदेश दिला जातो की चांगले प्रदर्शन केले तरच संघातील जागा टिकून राहील.”

“मी ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून पाहत आहे. भारतीय संघात क्रिकेटच्या तिन्ही स्वरुपात कोणता-ना-कोणता नवा खेळाडू येत आहे आणि शानदार प्रदर्शन करत आहे. यावेळी अनुभवी खेळाडूही त्यांची भूमिका योग्यरित्या पार पाडत आहेत. मात्र जेव्हा ज्यूनियर खेळाडू अशाप्रकारचे धडाकेबाज प्रदर्शन करु लागतात; तेव्हा त्या संघाविषयी बऱ्याच गोष्टी कळू लागतात. मागील सहा महिन्यांपासून भारतीय संघ खूपच जबरदस्त कामगिरी करत आहे,” असे इंजमाम शेवटी म्हणाले.

Impressive Bowling BY Krishna | Successful Start For Team India in ODI Series | Inzamam-ul-Haq

कृणाल-प्रसिद्धची पहिल्या वनडेतील कामगिरी
अष्टपैलू कृणालने आपल्या पहिल्या वनडे सामन्यात नाबाद अर्धशतकी खेळी केली. त्याच्या खेळीची विशेष बाब ही की, संघाची गाडी डगमगत असताना खालच्या फळीत फलंदाजीला येत त्याने ताबडतोब अर्धशतक केले. ३१ चेंडूत २ षटकार आणि ७ चौकार मारत त्याने नाबाद ५८ धावा चोपल्या. यामुळे भारताना ३१७ धावांचा डोंगर उभारता आला.

दुसरीकडे वेगवान गोलंदाज प्रसिद्धने १५ व्या षटकात १३५ धावांवर संघाला पहिली विकेट मिळवून दिली. इंग्लंडचा सलामीवीर जेसन रॉयला त्याने ४६ धावांवर झेलबाद केले.  त्यानंतर बेन स्टोक्स, सॅम बिलिंग्स आणि टॉम करन यांच्या महत्त्वाच्या विकेट्स काढल्या.

महत्त्वाच्या बातम्या-

मुंबई इंडियन्सचा आश्चर्यकारक निर्णय, केवळ दोन प्रथम श्रेणी सामने खेळलेल्या खेळाडूची संघात केली निवड

अय्यर नसताना रहाणेच्या हाती दिल्ली कॅपिटल्सच्या नेतृत्त्वाची धुरा, सोशल मीडियावर मागणीला जोर

भारताची ही शॅडो टीम पाहिलीत का? इंग्लंड नाही तर जगातील कोणत्याही क्रिकेट संघाला पाजू शकेल पराभवाचे पाणी!

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---