यंदाच्या टी20 विश्वचषकात मोठ मोठे फेर बदल होताना पहायला मिळाले आहे. ज्यामध्ये पाकिस्तान संघाला मोठा धक्का बसाला आहे, कारण चालू विश्वचषकातून पाकिस्तान बाहेर पडला आहे. पाकिस्तान आपल्या पहिल्या दोन सामन्यात भारत आणि अमेरिकेविरुद्ध पराभव झाला आहे. यजमान अमेरिकेने सुपर ओव्हर मध्ये पाकिस्तानला मात दिला होता. तर भारतीय संघाने पाकिस्तानचा 6 धावांनी लाजिरवाणा पराभव केला होता. त्यानंतर पाकिस्तान कमबॅक करत तिसऱ्या सामन्यात कॅनडा विरुद्ध विजय मिळवला होता.
यजमान अमेरिका संघाने विश्वचषकात उल्लेखनीय कामगिरी केली, ज्याचा फटका पाकिस्तानला बसला. अमेरिकेने आपल्या पहिल्या दोन सामन्यात विजय मिळवला होता आणि भारतासमोर त्यांचा पराभव झाला मात्र संघाकडे 4 गूण प्राप्त होत्या आणि साखळी फेरीतील शेवटचा सामना आयर्लंड विरुद्ध होणार होता. पण हा सामना पावसामुळे रद्द झाला. त्याचाच फायदा अमेरिकेला मिळाला सामना रद्द झाल्याने संघास 1 गूण देण्यात आले. ज्या जोरावर संघाकडे एकूण 5 गूण झाल्याने सुपर-8 साठी अमेरिका पात्र ठरला. दुसरीकडे पाकिस्तान संघ तीन पैकी एकच सामना जिंकला आहे. त्यामुळे त्यांच्याकडे केवळ 2 गूण आहेत पुढच्या सामन्यात पाकिस्तान जिंकले तरी त्यांच्याकडे 4 गूण होतील जे सुपर-8 साठी पात्र ठरण्यास पुरेसे नाहीत.
बाबर आझमच्या संघाच्या कामगिरीवर पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटूनी सूनावले आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफाॅर्म ‘X’ वर पोस्ट शेअर करत संघातील खेळाडूंवर प्रतिक्रिया दिली आहेत.
वसीम आक्रम म्हणाले, “यूएसए सुपर 8 साठी पात्र ठरण्यात यशस्वी ठरले आहे. त्यांनी उत्कृष्ट खेळ दाखवला आहे आणि हा संघ सुपर 8 मध्ये जाण्यास पात्र आहे. आता पाकिस्तानची काय योजना आहे, आता त्यांना यूके ची फ्लाइट पकडावी लागेल.” यूके आणि नंतर घरी जा” अश्या शब्दात वसीम आक्रमने राग व्यक्त केले आहे.
याच दरम्यान, पाकिस्तानच्या पराभवावर रावळपिंडी एक्सप्रेस या नावाने प्रसिद्ध असलेला माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने एक प्रतिक्रिया दिली आहे जी आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शोएब अख्तरने लिहिले, ‘पाकिस्तानचा विश्वचषक प्रवास संपला’
Pakistan’s World Cup journey is over.
— Shoaib Akhtar (@shoaib100mph) June 14, 2024
2024 च्या टी20 विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्याच टप्प्यातून पाकिस्तान संघ बाहेर पडला आहे. ज्यानंतर बाबर अँड कंपनी आपल्याच देशातील माजी महान क्रिकेटपटूंचे बळी ठरत आहे. संघाचा माजी कर्णधार मोहम्मद हाफिजनेही या खेळाडूंचा समाचार घेतला आहे. त्याने पाकिस्तान क्रिकेट हॅशटॅगसह आपल्या पोस्टमध्ये लिहिले,”कुर्बानी के जानवर हाजिर हों’ असं म्हणत खडसावले आहे.
Qurbani Kay Janwar Hazir Hon… 🐐 🐐🐐🐐🐐🐐….. #PakistanCricket
— Mohammad Hafeez (@MHafeez22) June 14, 2024
पोस्ट शेअर करताना शहजादने लिहिले की, “योग्य संघ सुपर 8 फेरीत पोहोचला आहे. जर तुम्ही कोणालाही हरवण्यासाठी आयर्लंडवर अवलंबून असाल, तर तुम्ही पात्र ठरण्यास पात्र नाही. असा विचार करू नका की ” कुदरत का निजाम” देखील यासाठी काम करतो. जे पात्र नाहीत किंवा सुधारण्यास इच्छुक नाहीत त्यांच्याकडे आता सर्वांच्या नजरा पीसीबीच्या अध्यक्षांवर आहेत.
The deserving team is through to Super 8 round. If you’re depending on Ireland to defeat someone, you seriously don’t deserve to qualify. Don’t think even “Kudrat Ka Nizam” works for those who are not deserving or ready to improve. All eyes on PCB chairman now! #T20WorldCup
— Ahmad Shahzad 🇵🇰 (@iamAhmadshahzad) June 14, 2024
विश्वचषक सुरु होण्यापूर्वी आर्मीकडून ट्रेनिंग घेऊन सुद्धा पाकिस्तान संघ विश्वचषकातून बाहेर पडला, मग संघाने आर्मीकडून नेमके काय शिकवण घेतली? हा प्रश्न उपस्थित होत आहे.
महत्तवाच्या बातम्या-
कॅनडाविरुद्धच्या सामन्यात भारताच्या ‘या’ खेळाडूंना मिळू शकते विश्रांती, संघात मोठे बदल अपेक्षित
‘कुदरत का निजाम’ पुन्हा एकदा अपयशी! पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम मोक्याच्या क्षणी नेहमीच होतो फ्लॉप
न्यूझीलंडने युगांडाचा 9 गडी राखून केला पराभव, नोंदवला स्पर्धेतील पहिला विजय