भारतीय संघाचा युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग आयपीएल 2022 नंतर चांगलाच चर्चेत आहे. अर्शदीपने आयपीएल प्रदर्शनाच्या जोरावर भारतीय संघात स्थान पक्के केले आणि आता तो टी-20 विश्वचषक देखील खेळणार आहे. त्याच्या उत्कृष्ट गोलंदाजीसाठी अनेकजण त्याचे कौतुक करत असले, तरी पाकिस्तानचे माजी दिग्गज आकिब जावेद यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या मते विरोधी संघ अर्शदीपसारख्या गोलंदाजांची दखलही घेत नाहीत.
भारताचा 23 वर्षीय डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) याने 7 जुलै 2022 रोजी इंग्लंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने आतापर्यंत 11 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले असून यामध्ये 14 विकेट्स घेतल्या आहेत. अर्शदीपमुळे भारताला शेवटच्या षटकांमध्ये किफायतशीर गोलंदाजी करणारा खेळाडू मिळाला आहे. त्याने ही गोष्ट सिद्ध देखील केले आहे की, तो दबावाच्या परिस्थितीत चांगली गोलंदाजी करू शकतो. असे असले तरी, माजी पाकिस्तानी दिग्गज आकिब जावेद (Aaqib Javed) यांचे मत मात्र वेगळे आहे. जावेद यांच्या मते अर्शदीपमध्ये अशी कोणतीही गुणवत्ता नाहीये, ज्यामुळे विरोधी संघ त्याला घाबरतील.
पाकिस्तानच्या एका माध्यमाशी बोलताना आकिब जावेद म्हणाले की, “अर्शदीप सिंग केवळ एक साधा गोलंदाज आहे. टी-20 क्रिकेटमध्ये तुमच्याकडे एक तर भुवनेश्वर कुमासारखा स्विंग असला पाहिजे किंवा गती असली पाहिजे. असे नसले तर, तुम्ही उंच असला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला बाउंस मिळेल. तुमच्याकडे स्वतःचे खास शस्त्र असले पाहिजे. जेव्हा तुम्ही जगभरातील गोलंदाजांना पाहता, तेव्हा समजते की, त्यांची प्रत्येकाची वेगळी वेगळी शैली आहे. उदाहरणार्थ बुमराहकडे उत्कृष्ट यॉर्कर टाकण्याची शैली आहे. हार्दिक पंड्या योग्य बाउंसर टाकतो. हार्दिक पंड्या बाउंसर टाकण्यात माहिर आहे. शाहीन आफ्रिदीकडे स्विंग आहे आणि हारिस रउफकडे गती आहे. त्यामुळे अर्शदीप साधारण गोलंदाज नाहीये, कारण त्याच्याकडे कोणतीच कला नाहीये. विरोधी संघ अशा गोलंदाजांचा विचार देखील करत नाहीत.”
दरम्यान, आकिब जावेद जरी अर्शदीपला हलक्यात घेत असले, तरी तो टी-20 विश्वचषकात नक्कीच पाकिस्तानी संघावर भारी पडू शकतो. टी-20 विश्वचषक ऑस्ट्रेलियामध्ये खेळला जाणार आहे आणि अर्शदीपसाठी हा पहिलाच ऑस्ट्रेलिया दौरा आहे. अशात याठिकाणी तो काय कमाल दाखवतो याची उत्सुकता सर्वच चाहत्यांना लागली आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
अखेर पुजाराने उलगडले तुफानी फॉर्मचे रहस्य! म्हणाला, “त्यांना पाहून मी बदललो”
गुजरात टायटन्सने शुबमन गिलला दिला नारळ? ट्विट करत लिहिले…
टी20 विश्वचषकापूर्वी खूपच बिझी आहे भारतीय संघ; पाहा कधी, कोणाविरुद्ध खेळणार आहे सामने?






