भारतीय क्रिकेट संघ विश्वचषक 2023 मध्ये चमकदार कामगिरी करत आहे. या विश्वचषकात भारतीय संघाने विजयाचे पंजे उघडले आहेत. भारताच्या चमकदार कामगिरीमध्ये विराट कोहलीचाही मोठा हात आहे. या विश्वचषकात कोहलीची बॅट चमकदार कामगिरी करत आहे. दरम्यान, भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज एस श्रीशांतने विराट कोहलीबद्दल एक मोठी गोष्ट सांगितली आहे. तो म्हणाला की, या दिग्गज फलंदाजाचे विक्रम मोडणे भविष्यातील फलंदाजांसाठी खूप कठीण जाईल.
विराट कोहली (Virat Kohli) याने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत 78 आंतरराष्ट्रीय शतके झळकावली आहेत. त्यापैकी 48 शतके वनडेमध्ये आहेत. अशा स्थितीत तो सचिन तेंडुलकरच्या वनडेतील सर्वाधिक 49 शतकांची बरोबरी करण्यापासून केवळ एक शतक लांब आहे.
स्पोर्ट्सकीडाशी बोलताना एस श्रीशांत (S Shreesanth) म्हणाला की, “मला वाटते की, विराट कोहली सचिन तेंडुलकर (Sachin Teandulkar) याचा हा विक्रम मोडेल आणि भविष्यातील फलंदाजांसाठी त्याचा हा विक्रम मोडणे खूप कठीण जाईल. आपण सर्वजण सचिन तेंडुलकरच्या विक्रमांबद्दल बोलतो पण कोहली त्याचे शतक, अर्धशतक आणि विश्वचषकातील सर्वाधिक धावांचे विक्रम मोडेल. त्यानंतर कोहलीचा विक्रम मोडणे फार कठीण जाईल.”
तो पुढे म्हणाला, “तुम्ही विराट कोहलीबद्दल सतत बोलू शकता. विश्वचषकात आपण त्याच्यामध्ये पाहिलेली एक उत्तम गोष्ट म्हणजे भूक. ही भूक केवळ धावांची नाही. क्षेत्ररक्षण करतानाही तो पूर्ण उत्साह दाखवतो. जगभरात आणि भारतात क्रिकेट हा एक धर्म मानला जातो. ती एक भावना आहे. विराट कोहली खूप भावनेने खेळतो.”
या विश्वचषकामध्ये विराट कोहलीची बॅट खूप धुमाकुळ घालत आहे. त्याने भारतीय संघासाठी आतापर्यंत खेळलेल्या पाच डावांमध्ये 354 धावा केल्या आहेत. आगामी सामन्यांमध्ये त्याची बॅट अशीच चांगली कामगिरी करेल आणि भारताला आपल्याच भूमीवर विजेतेपद मिळवून देईल, अशी आशा चाहत्यांना आहे. (Former player big prediction about Kohli Said This hunger is only)
म्हत्वाच्या बातम्या
बिग ब्रेकिंग! ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी घोषित केला संघ, कर्णधार कोण? वाचा
पाकिस्तानच्या पराभवानंतर चिडला हरभजन सिंग, थेट आयसीसीला मागणी करत म्हणाला, ‘हा’ नियम बदलाच…