---Advertisement---

सौरव गांगुलीला कठिण काळात प्रणव मुखर्जींनी दिले होते समर्थन; म्हणाले होते…

On: बुधवार, सप्टेंबर 2, 2020 9:13 PM
---Advertisement---

कोलकाता। दिवंगत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना फुटबॉलची आवड होती आणि त्यांना क्रिकेटमध्ये रस नव्हता, परंतु २००६ मध्ये जेव्हा सौरव गांगुलीला भारतीय क्रिकेट संघातून वगळण्यात आले तेव्हा त्यांनी त्याविरूद्ध जोरदार हल्ला चढविला होता.

हा तोच कालावधी होता जेव्हा भारतीय संघाचे तत्कालीन प्रशिक्षक ग्रेग चॅपल आणि कर्णधार सौरव यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला होता. सौरवला भारतीय संघातून काढून टाकल्याबद्दल कोलकाताच्या रस्त्यावर निषेध सुरू झाला. तत्कालीन संरक्षणमंत्री प्रणव मुखर्जीही सौरवच्या समर्थनार्थ आले.

ते म्हणाले- ‘भारतीय संघात सौरव निश्चितच स्थान मिळवण्यास पात्र आहे. माझा विश्वास आहे की क्रिकेट किंवा कोणत्याही खेळामध्ये कोणतेही राजकारण होऊ नये. सौरव चांगला खेळाडू आहे. त्याला संघात स्थान मिळायला हवे.’

प्रणव मुखर्जी पुढे म्हणाले, खेळ प्रत्येक समाजासाठी महत्त्वाचा असतो. खेळ राष्ट्रीय एकात्मता, अभिमान आणि मैत्रीची भावना वाढवते.

चॅपेलशी झालेल्या वादामुळे नोव्हेंबर २००५ मध्ये सौरवला एकदिवसीय क्रिकेट संघाच्या कर्णधारपदावरून काढून टाकले गेले आणि त्याच्या जागी राहुल द्रविडला कर्णधार म्हणून नेमले गेले. नंतर त्याला एकदिवसीय संघातून बाहेर जाण्याचा मार्गही दाखविण्यात आला. त्यानंतर पुढल्या वर्षी जानेवारीत सौरवला कसोटी संघातूनही वगळण्यात आले.

जेव्हा २००० साली सामना फिक्सिंगच्या आरोपामुळे भारतीय संघाने प्रतिष्ठा गमावली तेव्हा सौरव गांगुलीला संघाचा कर्णधार बनविण्यात आले होते. सौरवने त्या कठीण परिस्थितीत एक नवीन संघ तयार केला आणि परदेशातही संघाला जिंकायला शिकवले. गांगुलीच्या नेतृत्वात भारतीय संघाने २००२ मध्ये इंग्लंडचा लॉर्ड्समध्ये पराभव करून नेटवेस्ट करंडक जिंकलाच नाही तर २००३ च्या वनडे विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीतही प्रवेश केला. सौरवच्या नेतृत्वाखाली संघाला युवराज सिंग, वीरेंद्र सेहवाग, हरभजन सिंग हे खेळाडू मिळाले, ज्यांनी पुढे जाऊन स्वतःला विश्वविजेता म्हणून सिद्ध केल. सध्या सौरव गांगुली हा बीसीसीआयचा अध्यक्ष आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

किंग्स इलेव्हन पंजाबचा धुरंदर म्हणतोय, आयपीएलमध्ये न खेळण्यापेक्षा नियमांचे पालन करणे बरे

१२.५कोटी रुपयांना संघात विकत घेतलेल्या खेळाडूविषयी वाटतेय राजस्थान रॉयल्सला चिंता, कारण घ्या जाणून

किंग्स इलेव्हन पंजाबच्या खेळाडूंनी असा घालवला समुद्र किनाऱ्यावर वेळ, पहा व्हिडिओ

ट्रेंडिंग लेख – 

तिशीतच आयर्लंडचा दिग्गज झालेला पॉल स्टर्लिंग

काय तर, बेल्स हरवल्यामुळे सामना सुरु झाला नाही!

असे ५ परदेशी क्रिकेटर, जे आयपीएलमधून कमवतात सर्वाधिक पैसे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---