आशिया चषक 2022 पासून भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज विराट कोहली चांगल्याच फॉर्ममध्ये आहे. आशियाचषकापूर्वी विराट अनेक वर्षे खराब फॉर्मशी झगडत होता. मात्र, एका दीर्घ ब्रेकनंतर विराटला पुन्हा एकदा लय सापडली आहे. सन 2019नंतर विराटने आशिया चषकात अफगाणिस्तानविरुद्ध 3 वर्षांनंतर पहिले शतक ठोकले. त्यानंतर आता मागील 4 वनडे सामन्यात विराटने 3 शतके झळकावली आहेत. यावर भारतीय संघाचे माजी निवडकर्ते एमएसके प्रसाद यांनी मोठे भाष्य केले आहे.
एमएसके प्रसाद (MSK Prassad) म्हणाले की, विराट कोहली (Virat Kohli) याला मानसिक विश्रांती हवी होती. आता त्याची कारकीर्द 4-5 वर्षांसाठी वाढली आहे.
विराटच्या मानसिक विश्रांतीविषयी प्रसाद यांचे भाष्य
माध्यमांना दिलेल्या एका मुलाखतीत एमएसके प्रसाद यांनी विराट आणि त्याच्या मानसिक विश्रांतीविषयी भाष्य केले. ते म्हणाले की, “मला वाटले की, मानसिक विश्रांतीने विराटची कारकीर्दी 4-5 वर्षे पुढे वाढवली आहे. तो त्याप्रकारचा खेळाडू आहे, ज्यांना आव्हानांची गरज आहे. तसेच, त्याने ते आव्हान स्वीकारले आहे आणि पुढे गेला आहे. त्याने एक चांगला ब्रेक घेतला आणि त्याने स्वत:ला चांगल्याप्रकारे समजले. आता आपल्याला जुना विराट कोहली परत मिळाला आहे. त्याला वास्तवात कोणत्याही इतर गोष्टीपेक्षा जास्त गरज मानसिक विश्रांतीची होती.”
एमएसके प्रसाद यांनी विराटच्या शानदार 2016 वर्षाची आठवण काढली. ते म्हणाले की, “त्याचा कठीण काळ आला होता. मात्र, तो खेळत राहिला, ज्यामधून त्याला भरपूर काही शिकता आले. मला वाटले की, त्याने खूप आधीच ब्रेक घ्यायला पाहिजे होता. कदाचित टी20 विश्वचषक 2021च्या नंतर लगेच. जेव्हापासून त्याने आशिया चषक 2022पूर्वी ब्रेक घेतला आहे, आपल्याला खरा विराट कोहली परत मिळाला आहे. ज्याला आपण 2016प्रमाणे खूप साऱ्या धावा करताना पाहिले होते.”
विराट कोहली याने नुकत्याच पार पडलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत विराट 3 सामन्यात खेळला. यादरम्यान 3 डावात फलंदाजी करताना त्याने 141.50च्या सरासरीने 283 धावा चोपल्या. यादरम्यान विराटने 2 खणखणीत शतकेही झळकावली. या कामगिरीसाठी त्याला मालिकावीर पुरस्कारानेही गौरवण्यात आले. आता विराट न्यूझीलंडविरुद्ध 18 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत खेळताना दिसणार आहे. (former selector msk prasad says cricketer virat kohli needed mental break pushed career 4 5 years)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सरफराज तोंडाने नाही, तर बॅटने बोलतोय; राष्ट्रीय संघात संधी न मिळाल्यानंतर पुन्हा ठोकले शतक
टीम इंडियाच्या माजी कर्णधारावर गुन्हा दाखल; महाराष्ट्रातील बड्या राजकीय नेत्याशी संबंध