भारतीय खेळाडू नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. कधी ते मैदानातील आक्रमक स्वभावामुळे, तर कधी आपल्याच देशाच्या माजी खेळाडूशी असलेल्या वादामुळे सर्वांचे लक्ष वेधतात. यामध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयचा माजी अध्यक्ष सौरव गांगुली आणि विराट कोहली यांचा समावेश आहे. गांगुलीने विराटच्या कसोटी कर्णधारपदाच्या वादावर पुन्हा एकदा भाष्य केले आहे. तो म्हणाला आहे की, विराटने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय स्वत: घेतला होता. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेनंतर स्वत: कसोटी कर्णधारपद सोडले होते.
काय म्हणाला गांगुली?
माध्यमांशी बोलताना सौरव गांगुली (Sourav Ganguly) म्हणाला की, “विराट कोहली याला कर्णधारपदावरून काढण्याचा निर्णय बीसीसीआयचा नव्हता. कोहलीने स्वत: कर्णधारपद सोडण्याचा विचार केला होता. यावर विराटच उत्तर देऊ शकतो की, त्याने कर्णधारपद का सोडले.
तो पुढे म्हणाला की, “कोहलीने कर्णधारपद सोडल्यानंतर बीसीसीआयकडे रोहित शर्मा याच्या रूपात सर्वोत्तम पर्याय होता. आयपीएल जिंकणे विश्वचषक जिंकण्यापेक्षा कठीण आहे. रोहितने पाच आयपीएल किताब जिंकले होते. माझा विश्वास आहे की, रोहित शर्मा कसोटीत भारताचा चांगला कर्णधार आहे.”
काय आहे संपूर्ण वाद?
विराट कोहली (Virat Kohli) याने टी20 विश्वचषक 2022 पूर्वी म्हटले होते की, तो टी20 कर्णधारपद सोडणार आहे. मात्र, त्याने असेही म्हटले होते की, त्याला कसोटी आणि वनडे संघाचे नेतृत्व करत राहायचे आहे. मात्र, बीसीसीआय याविषयी सहमत नव्हती. त्यामुळे नंतर विराटकडून कसोटी आणि वनडे संघाचे नेतृत्व काढून घेण्यात आले होते.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी विराटने सर्वांना हे सांगून धक्का दिला होता की, “संघ निवडीवेळी मला अचानक मीटिंगनंतर सांगण्यात आले की, तुला वनडे कर्णधारपदावरून हटवण्यात आले आहे. मी निवडकर्त्यांच्या निर्णयावर होकार दिला. जेव्हा मी टी20 कर्णधारपद सोडण्याविषयी बोललो, तेव्हा मला कुणीही म्हटले नव्हते की, मी टी20 कर्णधार बनून राहावे.”
मात्र, या मुद्द्यावर गांगुली नंतर म्हणाला होता की, तो विराटला टी20 कर्णधारपद कायम ठेवण्याबाबत बोलला होता. आता गांगुलीने विराटच्या नेतृत्व सोडण्याविषयी केलेले विधान चर्चेचा विषय ठरत आहे. (former skipper sourav ganguly reply on virat kohli captaincy controversy)
महत्वाच्या बातम्या-
कसोटी इतिहासातील 5 सर्वात यशस्वी कर्णधार, यादीत विराट एकटाच भारतीय; सर्वाधिक विजयी टक्केवारी ‘या’ संघाची
‘IPL ट्रॉफी जिंकणे विश्वचषक जिंकण्यापेक्षा महाकठीण…’, गांगुलीच्या विधानाने देशभरात माजू शकते खळबळ





