दक्षिण आफ्रिका संघाचे माजी व्यवस्थापक गूलाम राजाह यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. गूलाम यांचे वयाच्या 74 व्या वर्षी निधन झाले आहे. गूलाम हे जवळजवळ 2 महिने कोरोनाविरुद्ध लढत होते. परंतु ते कोरोनाशी लढण्यात अपयशी ठरले आणि त्यांची प्राणज्योत मावळली. गूलाम यांनी जवळजवळ 2 दशकापर्यंत दक्षिण आफ्रिका संघासोबत अनेक दौरे केले आहेत.
Photo: Mr Rajah Managed our current Head Coach Hussein Manack for Transvaal Team at Lords 1992 vs MCC X1 pic.twitter.com/tTe6d5PH1y
— Marks Park Cricket (@MarksParkCC) June 29, 2021
2011 मध्ये घेतला संन्यास
गूलाम राजाह पेशाने फार्मासिस्ट होते. त्यांनी 1992 पासून 2011 पर्यंत राष्ट्रीय दक्षिण आफ्रिका संघासोबत काम केले होते. अनेक खेळाडूंचे प्रिय राहिलेले गूलाम बऱ्याचदा मोठी संधी मिळताच क्रिकेटपटूंसोबत ड्रेसिंग रूममध्ये वेळ घालवत असायचे. 1999 च्या विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यामध्ये झालेला संघाचा पराभव हा त्यामधील एक भाग होता. याच दरम्यान त्यांनी खेळाडूंना रडताना सावरले होते. गूलाम त्यांच्या कारकिर्दीमध्ये 107 खेळाडूंसोबत 600 पेक्षा जास्त सामन्यांमध्ये सहभागी झाले होते.
दिग्गज व्यक्तींनी दिला शेवटचा निरोप
अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी सोशल मीडियाद्वारे गूलाम यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज शॉन पोलाकने त्यांच्यासोबतचा एक फोटो ट्विटरवर पोस्ट करत लिहिले की, ‘राजाह यांच्या निधनाची बातमी ऐकूण खूप दुःख झाले. ते एक मित्र आणि संघाचे दिग्गज संघ व्यवस्थापक होते. ते माझ्या क्रिकेट कारकिर्दीतील महत्वाचा भाग होते.’
Truly sad to hear of the passing of Goolam Rajah- a friend and legendary team manager of the Proteas. He was an integral part of my cricketing journey, always professional and treated us as family. Thoughts are with Poppy and family. pic.twitter.com/oDghH5V2HD
— Shaun Pollock (@7polly7) June 29, 2021
Sad news hearing of the passing of Goolam Rajah. What a good man we have lost. Thoughts and prayers to family. RIP my pal
— Jacques Kallis (@jacqueskallis75) June 29, 2021
तर माजी अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिसने लिहिले की, ‘राजाह यांच्या निधनाची बातमी ऐकल्यानंतर दुःख वाटले. एका चांगल्या व्यक्तीला आम्ही गमावले आहे. त्यांच्या परिवारासोबत माझी सहानुभूती आहे.’
माजी कर्णधार ग्रीम स्मिथ यांनी त्यांना अनेक खेळाडूंचे पिता असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, ‘ते प्रत्येक गोष्टी बारकाईने पाहात की खेळाडू पूर्णपणे क्रिकेटवर कसे लक्ष केंद्रीत करू शकेल आणि यामुळेच त्यांची कारकीर्द यशस्वी ठरली.’
महत्त्वाच्या बातम्या-
इंग्लंडच्या ‘या’ गोलंदाजापुढे श्रीलंका फेल, पावरप्लेत ४ निर्धाव षटके टाकत केला ‘खास विक्रम’
इंग्लंडमध्ये घोंगावलं जो रूटचं वादळ, अर्धशतक झळकावत ‘या’ विक्रमांत केली रिचर्ड्सची बरोबरी
बांगलादेशी क्रिकेटपटूंच्या गैरवर्तनामुळे ‘या’ नामवंत पंचांचे मोठे पाऊल, सोडली पंचगिरी