भारतीय संघात असे काही खेळाडू आहेत, जे अलीकडे प्रत्येक क्रिकेट प्रकारात खराब फॉर्मचा सामना करताना दिसत आहेत. त्यामध्ये कर्णधार रोहित शर्मा याच्या नावाचाही समावेश आहे. नुकताच भारतीय संघाने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सामना केला. या सामन्यात भारताचा पराभव झाला. रोहितला इथेही खास प्रदर्शन करता आले नाही. त्यानंतर त्याच्या फॉर्मविषयी सातत्याने प्रश्न उपस्थित होत आहेत. अशात दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज माजी खेळाडू ग्रीम स्मिथ त्याच्या मदतीसाठी धावला आहे.
काय म्हणाला ग्रीम स्मिथ?
ग्रीम स्मिथ रोहित शर्मा (Graeme Smith Rohit Sharma) याच्या संघर्षाविषयी बोलताना म्हणाला की, भारतीय कर्णधाराला सध्या जातेतवाणे होण्याची गरज आहे. सार्वकालीन सर्वोत्तम कसोटी कर्णधारांमध्ये गणल्या जाणाऱ्या ग्रीम स्मिथ (Graeme Smith) याने सांगितले की, वैयक्तिक फॉर्मचा परिणाम कर्णधारपदाच्या कर्तव्यावरही पडतो.
माध्यमांशी बोलताना तो म्हणाला की, “कर्णधार असण्याच्या सर्वात मोठ्या आव्हानांपैकी एक तुमचे वैयक्तिक प्रदर्शन आहे. रोहितला कदाचित ताजेतवाणे होण्याची गरज आहे. त्याचा स्वत:चा फॉर्म कदाचित सातत्याने या स्तरावर राहिला नाहीये. तो खराब काळातून जात आहे, जो नेहमी चांगले वैयक्तिक प्रदर्शन करून दूर केला जाऊ शकतो.”
‘अपयश मिळताच फक्त वरिष्ठ खेळाडूंना टीका सहन करावी लागते’
ग्रीम स्मिथने पुढे भारताच्या डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यातील पराभवावरही भाष्य केले. तो म्हणाला की, “जेव्हाही कोणते अपयश मिळते, तेव्हा नेहमी वरिष्ठ खेळाडूच असतात, ज्यांना सर्वाधिक ट्रोल केले जाते. जर तुम्ही मागील काही वर्षांमध्ये जाल, तर ही नेहमी स्वाभाविक बाब राहिली आहे. या गोष्टींसाठी एका योजनेची गरज आहे. हे तेच खेळाडू आहेत, जे तुम्हाला डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यात घेऊन गेले आहेत.”
भारताचा वेस्ट इंडिज दौरा
डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यानंतर भारतीय संघ 1 महिन्यांच्या विश्रांतीनंतर वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्याची सुरुवात 12 जुलैपासून भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघातील पहिल्या कसोटी सामन्याने होईल. यामध्ये रोहित भारताचे नेतृत्व करणार आहे. यादरम्यान तो कशी कामगिरी करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (former cricketer graeme smith reflects to rohit sharma poor form says this)
महत्वाच्या बातम्या-
अंकित बावणे ठरला MPL चा पहिला शतकवीर, कोल्हापूर टस्कर्सचा रत्नागिरी जेट्सवर रोमहर्षक विजय
ASHES 2023: दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचे पुनरागमन, ख्वाजाने झळकावले नाबाद शतक