भारतीय संघाचे माजी फिरकीपटू हरभजन सिंगने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून पदार्पण करून 23 वर्ष पूर्ण झाले. हरभजन सिंगने गोलंदाजीतून अनेक विक्रम केले आहेत. त्याचबरोबर क्रिकेटच्या प्रत्येक स्वरूपात त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
हरभजन सिंगने जेव्हा क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते तेव्हा त्याला या गोष्टी जराही अंदाज नव्हता की, तो इतक्या लांबपर्यंतचा क्रिकेट क्षेत्रात प्रवास करेल. दरम्यान, हरभजन सिंगने त्यांचा 23 वर्ष जुना एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे, जो सध्या व्हायरल होत आहे.
हरभजन सिंगने केला जुना व्हिडिओ पोस्ट
भारतीय संघाचा फिरकीपटू हरभजन सिंगने इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हरभजन सिंगने पोस्ट केलेला हा व्हिडीओ 1998 मधला आहे. तेव्हा भारतीय संघाने 1998 साली मलेशिया येथे खेळल्या गेलेल्या राष्ट्रकूल स्पर्धेत भाग घेतला होता. त्यावेळी हरभजन सिंग फक्त 18 वर्षांचा होता.
भावूक झाला हरभजन सिंग
हरभजन सिंगने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये दिसते की हरभजन सिंगने अँटिग्वा आणि बारबुडा संघाचा फलंदाज सिल्वेस्टर जोसफला बाद केले होते. हा व्हिडिओ पोस्ट करत हरभजन सिंगने कॅप्शन लिहीले की, ‘जेव्हा राष्ट्रकूल स्पर्धेमध्ये क्रिकेट खेळले जात होते.’
https://www.instagram.com/p/CQ-aNVRBQFc/
अजय जडेजा होता कर्णधार
साल 1998 झालेल्या राष्ट्रीकूल स्पर्धेमध्ये अजय जडेजा भारतीय संघाचा कर्णधार होता. तर अनिल कुंबळेला उपकर्णधारपदी नियुक्त करण्यात आले होते. या स्पर्धेत भारतीय संघ तिसऱ्या क्रमांकावर होता आणि इथूनच भारतीय संघाला या स्पर्धेतून बाहेर जावे लागले होते. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत करून दक्षिण आफ्रिकेने सुवर्णपदक जिंकले होते.
हरभजन सिंगने आपल्या कारकिर्दीतील शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 2016 मध्ये खेळला होता. हरभजन सिंगने अजून निवृत्तीची घोषणा केलेली नाही. त्याने इंडियन प्रीमियर लीगमध्ये 2008 पासून ते 2017 पर्यंत मुंबई इंडियन्स संघाकडून खेळले होते. तर 2018 आणि 2019 मध्ये चेन्नई सुपर किंग्जचे त्याने प्रतिनिधित्व करत होते. तर 2021 च्या आयपीएल हंगामात हरभजन सिंग कोलकाता नाइट रायडर्स संघाकडून खेळत होता.
महत्त्वाच्या बातम्या –
भारताविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी इंग्लंड संघाची घोषणा; ‘या’ दोन अनुभवी खेळाडूंचे झाले पुनरागमन
जून महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्कारासाठी नामांकनं जाहीर, भारताच्या ‘या’ २ खेळाडूंचा समावेश
‘कॅप्टनकूल’ धोनीने सावरली या ५ खेळाडूंची कारकिर्द, नाहीतर अवघड होते…