क्रिकेटविश्वातून एकापाठोपाठ एक भुवया उंचावणाऱ्या बातम्या येत आहेत. नुकतीच भारताचा माजी खेळाडू नमन ओझा याच्या वडिलांना फसवणूकप्रकरणात पोलिसांनी अटक केली. अशात आता श्रीलंका संघाचा १९९६च्या विश्वचषकाचा विजेता कर्णधार अर्जुन रणतुंगा याचा भाऊ कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे. सोमवारी (दि. ०६ जून) कोलंबो उच्च न्यायालयाने त्याला २ वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.
अर्जुन रणतुंगा (Arjuna Ranatunga) याचा ५५ वर्षीय लहान भाऊ प्रसन्ना रणतुंगा (Prasanna Ranatunga) याला ही शिक्षा एका व्यावसायिकाला धमकी देऊन पैसे उकळल्याप्रकरणी झाली आहे. मात्र, प्रसन्नाच्या पत्नीला या सर्व आरोपांतून मुक्त केले आहे.
सन २०१५मध्ये गुन्हा झाला होता दाखल
शहर विकास मंत्री प्रसन्नाविरुद्ध पैसे उकळल्याचा गुन्हा सन २०१५मध्ये दाखल केला गेला होता. उच्च न्यायालयाने प्रसन्नाला दोषी ठरवत २ वर्षांचा तुरुंगवासाच्या शिक्षेसोबतच ५ वर्षांच्या निलंबनाचीही शिक्षा सुनावली आहे. सोबतच न्यायालयाने प्रसन्नाला अडीच कोटी रुपयांदचा दंड भरण्याचे आणि व्यावसायिकाला दहा लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.
…नाहीतर वाढेल शिक्षा
मंत्री प्रसन्नाने जर दंड आणि नुकसान भरपाईची रक्कम दिली नाही, तर त्याच्या अडचणीत वाढ होऊ शकते. जर तो अडीच कोटी रुपये दंड भरण्यातही अपयशी ठरला, तर त्याचा तुरुंगवास ९ महिन्यांनी वाढेल. दुसरीकडे, प्रसन्ना व्यावसायिकाला १० लाख रुपये देऊ शकला नाही, तर त्याची शिक्षा ३ महिन्यांनी आणखी वाढेल. प्रसन्ना याच्यावर जी. मेंडिस नावाच्या व्यावसायिकाला धमकावण्याचा आणि ६ कोटी ४० लाख रुपये मागण्याचा आरोप होता.
भारताच्या माजी खेळाडूच्या वडिलांनाही अटक
भारतीय संघाचा माजी खेळाडू नमन ओझा (Naman Ojha) याच्या वडिलांना म्हणजेच विनय ओझा (Vinay Ojha) यांना बँक फसवणूक प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना एक दिवसीय पोलीस कोठडी सुनावली आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
धक्कादायक! माजी भारतीय खेळाडूच्या वडिलांना अटक, कोर्टाचा एक दिवसीय रिमांडचा आदेश, काय आहे प्रकरण?
तुरुंगवासात असलेल्या नवज्योत सिंग सिद्धूंची बिघडली तब्येत, रुग्णालयात करण्यात आले भरती
पाकिस्तान विरुद्ध शतक झळकावल्याचा आनंद अनावर, श्रीलंकन कर्णधाराचे ‘आक्रमक’ सेलिब्रेशन चर्चेत