ऑस्ट्रेलियाची माजी सुपरकार ड्रायव्हर रेनी ग्रेसी आर्थिक मंदीमुळे पॉर्न स्टार बनली आहे. तिच्या या निर्णयावर तिच्या वडिलांना अभिमान असल्याचे तिने सांगितले आहे.
मागील १४ वर्षांमध्ये ऑस्ट्रेलियाची पहिली पूर्णवेळ महिला सुपरकार ड्रायव्हर (Super Car Driver) बनणाऱ्या ग्रेसीने (Renee Garcie) एका मुलाखतीत म्हटले, “विश्वास करा, माझ्या वडिलांना याबद्दल माहीत आहे. तसेच, ते मला पाठिंबाही देत आहेत.”
ग्रेसी पुढे म्हणाली, “मला असे वाटते, ज्या आर्थिक संकटात मी आहे, त्यामुळे तुम्ही म्हणू शकता की माझ्या वडिलांना माझा अभिमान आहे.”
तसेच, ग्रेसीचा नवीन व्यवसाय हा स्वत: चा सेल्फी काढून इंटरनेटवर पोस्ट करणे आहे. त्यातून तिची कमाई होते.
रेसिंग सोडून पॉर्नच्या दुनियेत पाऊल ठेवल्यानंतर सुरवातीच्या आठवड्यात ग्रेसीची तब्बल २ लाख रुपयांची कमाई झाली होती. परंतु आता ती दर आठवड्याला जवळपास १९ लाख रुपयांची कमाई करत आहे.