वेस्ट इंडीजचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज दिनेश रामदिनने सोमवारी (१८ जुलै) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. रामदीनने स्वतःच्या सोशल मीडिया खात्यावरून तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचे सांगितले आहे. त्याने वेस्ट इंडीज संघासाठी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना डिसेंबर २०१९ मध्ये खेळला होता. निवृत्तीची घोषणा करताना त्याने, या निर्णयाचा आनंद असल्याचे सांगितले.
दिनेश रामदिन (Denesh Ramdin) याने स्वतःच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून सोमवारी अचानक एक पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची माहिती दिली. पोस्टमध्ये लिहिले आहे की, “ही खूप आनंदाची गोष्ट आहे की, मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करत आहे. मागचे १४ वर्ष एखादे स्वप्न पूर्ण झाल्यासारखे राहिले आहेत. मी त्रिनिदाद आणि टोबॅगो, तसेच वेस्ट इंडीजसाठी क्रिकेट खेळून माझ्या लहानपणीचे स्वप्न पूर्ण केले. मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून जरी निवृत्ती घेत असलो, तरी प्रोफेशनल क्रिकेटमधून मी निवृत्ती घेत नाहीये.”
पोस्टमध्ये पुढे असेही लिहिले आहे की, “माझ्या कारकिर्दीत मला जग पाहाण्याचे, वेगवेगळ्या संस्कृतींमधील मित्र बनवण्याचे आणि मी कुठून आलो याचे कौतुक करण्याची संधी दिली.” पोस्टमध्ये सामदिनने स्पष्ट केले आहे की, तो प्रेफेशनल क्रिकेट खेळणे थांबवणार नाहीये. तो फ्रँचायझी क्रिकेट अजूनही खेळत आहे. त्याने २०१३ पासून २०२१ पर्यंत त्याने गुयाना अमेजन वॉरियर्स, सेंट किट्स ऍन्ड नेविस पॅट्रियट्स आणि ट्रिनबागो नाईट रायडर्सचे प्रतिनिधित्व केले आहे. मात्र, तरीदेखील सीपीएलच्या आगामी हंगामात त्याला एकाही फ्रँचायझीने खेळण्याची संधी दिली नाहीये.
https://www.instagram.com/p/CgCvPTmuTwy/
रामदिनच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा एकंदरीत विचार केला, तर त्याने ७४ कसोटी, १३९ एकदिवसीय आणि ७१ टी-२० आंतरारष्ट्रीय सामने खेळले आहेत. सामदिन वेस्ट इंडीजच्या २०१२ आणि २०१६ टी-२० विश्वचषक विजेत्या संघाचा भाग राहिला आहे.
बातमी अवडेट होत आहे…
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
तिसऱ्या वनडेपूर्वी पंतला मिळालेला खास सल्ला, भारताचा माजी दिग्गजाचे ट्वीट व्हायरल
विराटच्या ‘बॅडपॅच’वर पाकिस्तानी दिग्गजाकडून सबुरीचा सल्ला; म्हणाला…
हार्दिक पंड्या एवढा उत्साहित आणि फिट कसकाय ? अष्टपैलूने स्वतः दिले स्पष्टीकरण