fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

धोनीसारखा खेळाडू स्टंम्पमागे असल्याने मी नशीबवान आहे – विराट कोहली

भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीवर मागील काही महिन्यात मोठ्या प्रमाणावर टीका झाली आहे. पण भारताचा कर्णधार विराट कोहलीने त्याला पाठिंबा देताना त्याच्यावरील टीका ही दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे.

विराटने इंडिया टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की ‘अनेक लोक धोनीवर टीका करतात हे पाहणे दुर्दैवी आहे. माझ्यासाठी प्रामाणिकता महत्त्वाची आहे.’

त्याचबरोबर विराटच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीच्या सुरुवातीला कर्णधार म्हणून धोनीने दिलेला पाठिंबा महत्त्वाचा असल्याचे सांगताना विराट म्हणाला, ‘जेव्हा मी संघात आलो होतो तेव्हा काही सामन्यांनंतर त्याच्याकडे माझ्याऐवजी अन्य वेगळे पर्याय होते. जरी मी मला मिळालेल्या संधीचा फायदा घेतला असला तरी त्याने दिलेला पाठिंबा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता.

‘तसेच त्याने मला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी दिली. अनेक युवा खेळाडूंना तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी मिळत नाही.’

याबरोबरच विराटने धोनीबरोबर असलेल्या परस्पर समजूतदारपणाबद्दल आणि त्यांच्यातील नात्याबद्दल सांगितले की ‘ही फक्त क्षेत्ररक्षण किंवा गोलंदाजीची गोष्ट नाही. आम्ही त्याला सांगतो की त्याला मैदानातील स्थिती, खेळपट्टीची गती बद्दल जास्त जाण आहे. आम्ही एकमेकांवर खूप विश्वास ठेवतो आणि सन्मान करतो.’

‘तो असा खेळाडू आहे ज्याला खरचं खेळाबद्दल माहिती आहे. तो खेळ पहिल्या चेंडूपासून ते 300 व्या(वनडेतील शेवटचा चेंडू) चेंडूपर्यंत समजून घेतो. मी असे म्हणणार नाही की तो असणे ही चैन आहे, पण मी नशीबवाण आहे की माझ्याकडे यष्टीमागे त्याच्यासारखी बुद्धी असणारा खेळाडू आहे.’

‘अखेर दिवसाच्या शेवटी मला संघव्यवस्थापन, धोनी आणि रोहित शर्माबरोबर रणनीती ठरवावी लागते.’

तसेच विराट पुढे म्हणाला, ‘शेवटच्या काही षटकांमध्ये मला माहित आहे की मला बाउंड्री लाईनजवळ उभे रहावे लागते. हाच माझा स्वभाव आहे. मला फक्त तिथे उभे राहण्यापेक्षा संघासाठी काहीतरी करायचे असते. 30-35 षटकांनतर त्याला(धोनी) माहित असते मी बाउंड्री लाईन जवळ असेल. त्यामुळे तो मग बाकी जबाबदारी घेतो.’

याबरोबरच 2019 विश्वचषकासाठी निवडण्यात आलेल्या संघाबद्दल बोलताना विराट म्हणाला, ‘आम्ही निवडलेल्या 15 खेळाडूंबद्दल आम्ही खूश आहेत. हा समतोल असलेला संघ आहे. कारण सध्या सर्व चांगल्या फॉर्ममध्ये आहेत.’

महत्त्वाच्या बातम्या –

विश्वचषक २०१९ साठी पाकिस्तानचा १५ जणांचा संघ जाहीर

विश्वचषकाच्या आधीच लसिथ मलिंगा घेणार निवृत्ती?

विश्वचषक २०१९: असा आहे दक्षिण आफ्रिकेचा १५ जणांचा संघ; ताहीर, अमलाला मिळाली संधी

You might also like