fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

विश्वचषकाच्या आधीच लसिथ मलिंगा घेणार निवृत्ती?

आज(18 एप्रिल) श्रीलंका क्रिकेट बोर्डाने 2019 विश्वचषकासाठी 15 जणांचा संघ घोषित केला आहे. या संघात अनुभवी फिरकी गोलंदाज लसिथ मलिंगालाही संधी देण्यात आली आहे. मात्र त्याला कालच (17 एप्रिल) श्रीलंकेच्या वनडे कर्णधारपदावरुन हटवत दिमुथ करुणारत्नेवर वनडे कर्णधारपदाची धूरा सोपवण्यात आली आहे.

विश्वचषकातही करुणारत्नेच श्रीलंकेचे नेतृत्व करणार आहे. त्याने त्याचा शेवटचा वनडे सामना 2015 च्या विश्वचषकात खेळला आहे. त्यामुळे सध्या क्रिकेटजगतात हा चर्चेचा विषय ठरला आहे. त्यातच काही रिपोर्टनुसार कदाचित कर्णधारपदावरुन हटवल्याने मलिंगा विश्वचषकाआधीच निवृत्ती घेणार असल्याचे म्हटले जात आहे

डेक्कन क्रोनिकलने दिलेल्या वृत्तानुसार श्रीलंकेच्या क्रिकेट निवड समीतीचे अध्यक्ष असंथा द मेल यांनी मलिंगाला फोन करुन कर्णधारपदाची हमी न देता त्याच्या उपलब्धतेबद्दल विचारले होते.

त्यानंतर तासाभरातच बुधवारी सकाळी 11.22 मिनीटांनी मलिंगाने खेळाडूंच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर सिंहाला भाषेत एक संदेश टाकला. त्या संदेशाचा अर्थ असा होतो की ‘आपण आता मैदानावर पुन्हा भेटू शकत नाही. मला पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे देव भले करो. तूम्हाला आशिर्वाद.

याबद्दल एक अधिकारी म्हणाले, ‘मला खात्री नाही त्याला काय म्हणायचे होते. पण तो निवृत्ती घेण्याबद्दल सुचीत करीत असावा. मलिंगाला माहित आहे, कर्णधारपदापेक्षा देशासाठी खेळणे महत्त्वाचे आहे. त्याने नेतृत्व केलेल्या 14 पैकी 13 सामन्यात पराभव स्विकारावा लागला आहे.’

त्याचबरोबर एका सुत्राने सांगितले की त्याने जर विश्वचषकातून माघार घेतली तर आमच्याकडे त्याचा बदली खेळाडू शोधण्यासाठी पुरेसा वेळ आहे.

Photo Courtesy: DECCAN CHRONICLE

महत्त्वाच्या बातम्या –

विश्वचषक २०१९: असा आहे दक्षिण आफ्रिकेचा १५ जणांचा संघ; ताहीर, अमलाला मिळाली संधी

रवी शास्त्री म्हणतात, विश्वचषकासाठी १६ जणांचा असायला हवा संघ

विश्वचषक २०१९: असा आहे श्रीलंकेचा १५ जणांचा संघ; या अनुभवी खेळाडूंना संधी नाही

You might also like