---Advertisement---

विराट पाठोपाठ आता गंभीरनेही केला आयसीसीच्या या कल्पनेला विरोध

On: सोमवार, जानेवारी 6, 2020 4:01 PM
---Advertisement---

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) व्यस्त वेळापत्रकातील वेळ वाचवण्याच्या दृष्टीने 2023 पासून सुरु होणाऱ्या कसोटी चॅम्पियनशिपमधील सामने चार दिवसीय करण्याचा विचार करीत आहे. मात्र ही कल्पना मुर्खपणाची असल्याचे भारताचा माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीरने (Gautam Gambhir) म्हटले आहे.

“सुरुवातीला मला असे म्हणायचे आहे की चार दिवसांचा कसोटी सामना ही एक हास्यास्पद कल्पना आहे. त्यामुळे हे लवकर रद्द केले पाहिजे. त्यामुळे हे अनिर्णित सामन्यांना आमंत्रित करेल, फिरकीपटूंसाठी जागा नसणार आणि पाचव्या दिवसाच्या खेळपट्टीवर खेळण्याचा मोह दूर करेल,” असे टाईम्स ऑफ इंडियाच्या स्तंभात गंभीर म्हणाला.

गंभीरसह अनेकांनी कसोटी सामने 5 दिवसांऐवजी 4 दिवस (4 days of test series instead of 5 days) करण्याच्या आयसीसीच्या या कल्पनेला विरोध केला आहे.

यामध्ये भारताचा कर्णधार विराट कोहली, ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचा कर्णधार टिम पेन (Tim Paine), ग्लेन मॅकग्रा (Glenn McGrath), नॅथन लायन (Nathon Lyon), तसेच दक्षिण आफ्रिकेच्या वर्नोन फिलँडर (Vernon Philander) यांनीही या प्रस्तावाला विरोध दर्शविला आहे.

पण यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे (Cricket Australia) प्रमुख केविन रॉबर्ट्स (Kevin Roberts) यांनी पाठिंबा दिला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---