आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) नुकतीच नवी वनडे गोलंदाजी क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीकडे पाहिल्यास यामध्ये भारतीय गोलंदाजांचा पूर्णपणे दबदबा दिसून येतो. भारतीय संघाचा युवा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याने या क्रमवारीत पुन्हा एकदा आपले पहिले स्थान मिळवले आहे. त्या व्यतिरिक्त भारताचे आणखी तीन गोलंदाज पहिल्या दहामध्ये दिसून येतात.
Siraj is No.1.
Kuldeep is No.4.
Bumrah is No.8.
Shami is No.10.– 4 Indian bowlers in the Top 10 of ODI Ranking, we're blessed to witness their dominance…!!! 🇮🇳 pic.twitter.com/uAkSei98k1
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 8, 2023
आयसीसीने जाहीर केलेल्या नव्या साप्ताहिक क्रमवारीत मोहम्मद सिराज हा पाकिस्तानच्या शाहीन शहा आफ्रिदीला मागे टाकत पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकावर पोहोचला. श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका यांच्याविरुद्ध केलेल्या चांगल्या कामगिरीचे बक्षीस त्याला मिळाले. या क्रमवारीत भारताचा प्रमुख फिरकीपटू कुलदीप यादव चौथ्या क्रमांकावर दिसून येतो. तर अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आठव्या तसेच दुसरा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी दहाव्या क्रमांकावर विराजमान आहे.
या संपूर्ण विश्वचषकात भारताचे सर्वच गोलंदाज उत्कृष्ट कामगिरी करताना दिसत आहेत. भारताच्या पाचही गोलंदाजांनी स्पर्धेत दहा किंवा त्यापेक्षा अधिक बळी मिळवून आपण सर्वोत्तम गोलंदाजी विभाग असल्याचे सिद्ध केले.
फलंदाजी क्रमवारीचा विचार केल्यास भारताचा युवा सलामीवीर शुबमन गिल पहिल्या क्रमांकावर दिसून येतो. तसेच भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा व अनुभवी विराट कोहली हे देखील पहिल्या दहामध्ये आहेत. यासोबतच सांघिक क्रमवारी देखील भारतीय संघ पहिल्या स्थानी दिसून येतो.
(Four Indian Bowlers In Top 10 In ICC ODI Bowling Ranking Siraj At Top)
हेही वाचा-
लय भारी! मॅक्सवेलची विस्फोटक खेळी पाहून अभिनेता रितेश देशमुखही बनला फॅन, म्हणाला, ‘हारलेली लढाई…’
ODI Rankings: 24 वर्षीय शुबमन बनला जगातील नंबर 1 फलंदाज, बाबरची बादशाहत संपुष्टात